मलंगगड जवळील नेवाळी येथून काळी पिवळ्या टॅक्सीत प्रवासी घेऊन कल्याण मध्ये पत्रीपूल मार्गे येत असलेल्या एका चालकाला दोन दुचाकी चालकांनी हुलकावणी दिली. काळी पिवळी टॅक्सीच्या दर्शक आरशाला धक्का लावून दुचाकी स्वार वेगाने पुढे गेले. त्यावेळी टॅक्सी चालकाने दुचाकी व्यस्थित चालवा, असे दुचाकी स्वारांना म्हणताच, त्यांनी टॅक्सी चालकाची टॅक्सी अडवून चालकाला लाकडी दांडके, लोखंडी सळईने बेदम मारहाण केली.

हेही वाचा – कल्याण डोंबिवली पालिकेतर्फे गणेश दर्शन स्पर्धेचे आयोजन ; गणेश मंडळांना संपर्क करण्याचे आवाहन

कल्याण पूर्वेतील पत्रीपुला जवळ दहा दिवसापूर्वी ही घटना रात्रीच्या वेळेत घडली. चालक गंभीर जखमी असल्याने तो रुग्णालयात उपचार घेत आहे. त्याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेतला.काळी पिवळी टॅक्सी चालक गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नितीन रमेश साळवी (२८, रा. काकडवाल, मलंग रस्ता, अंबरनाथ) असे टॅक्सी जखमी चालकाचे नाव आहे. प्रवासी वाहतूक नितीनच्या उदरनिर्वाहाचे साधन आहे.

संजय उदय गुप्ता (२०, रा योगेश नगर, सेक्शन २६, सरस्वती हिंदी हायस्कूल जवळ, उल्हासनगर ४), विकास राकेश वर्मा (२०, रा. माणेरे गाव, म्हसोबा रस्ता, वीटभट्टी, उल्हासनगर ४) आणि इतर चार अज्ञात अशी आरोपींची नावे आहेत.पोलिसांनी सांगितले, नितीन साळवी त्याच्या काळ्या पिवळ्या टॅक्सी मधून नेवाळी नाका येथून प्रवासी घेऊन कल्याण रेल्वे स्थानकाकडे येत होता. पत्रीपुला जवळ टॅक्सी चालकाला संजय गुप्ता, विकास वर्मा या दोन दुचाकी स्वारांनी छेद देऊन पुढे जाण्याचा प्रयत्न केला. या गडबडीत टॅक्सीचा दर्शक आरसा तिरपा झाला. नितीनने दुचाकी स्वारांना वाहन व्यवस्थित चालवता येत नाही का अशी विचारणा केली. त्याचा राग येऊन आरोपी संजय, विकास आणि त्याचे इतर चार साथीदार यांनी नितीनचे वाहन अडवून त्यांना ठोशाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. टॅक्सीच्या काचा फोडल्या. लोखंडी सळई, दांडक्याने नितीनवर प्रहार केले. या प्रकाराने टॅक्सीतील प्रवासी घाबरले.

हेही वाचा – डोंबिवली – ठाकुर्ली ते कोपर रेल्वे स्थानकांच्या दरम्यान सात महिन्यात १२५ जणांचा मृत्यू

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नितीनने टॅक्सीच्या दुसऱ्या दरवाजातून उतरुन पळून जाण्याचा प्रयत्न केला. नितीन पायात पाय अडकल्याने रस्त्यावर पडला. मारेकऱ्यांनी त्यांचा पाठलाग करुन त्यांना रस्त्यावर लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. चालक नितीनच्या डोळा, खांद्याला गंभीर दुखापती झाल्या आहेत.नितीन गंभीर जखमी असल्याने त्यांचा जबाब घेण्यास उशीर झाला. त्यामुळे याप्रकरणात उशिरा गुन्हा दाखल झाला आहे. या तरुणांकडे लोखंडी सळई, दांडके कोठुन आले. या तरुणांनी यापूर्वी अशा घटना केल्या आहेत का. दुचाकी तरुणांच्या मालकीच्या अन्य कोणाच्या आहेत याची माहिती पोलीस घेत आहेत.