फेसबुकच्या माध्यमातून व्यावसायिक, उद्योजक यांच्याशी मैत्री करायची. त्यांना निवासी सोय असलेल्या हाॅटेलमध्ये भोजनाचे निमित्त करुन बोलून घ्यायचे. माझे तुमच्यावर प्रेम आहे असे दाखवून त्यांना शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन त्यांच्या जवळील किमती ऐवज घेऊन पळून जाणाऱ्या एका महिलेला येथील मानपाडा पोलिसांनी गोवा राज्यातील पेड म्हापसा येथून सोमवारी अटक केली आहे.

हेही वाचा- ठाणे : नववर्षानिमित्त शहापूर जवळील माहुली किल्ल्यावर शंभुदुर्ग प्रतिष्ठानची स्वच्छता मोहीम

Telangana school attacked over saffron clothing row
विद्यार्थ्यांच्या भगव्या कपड्यांवर मुख्याध्यापकांचा आक्षेप; संतप्त जमावाकडून शाळेची तोडफोड, गुन्हा दाखल
Surat Diamond Bourse
सूरत डायमंड बोर्सकडे हिरे व्यापाऱ्यांची पाठ; अनेकजण पुन्हा मुंबईत परतले, नेमकं कारण काय? जाणून घ्या
foreign women prostitution, prostitution Kharghar,
वेश्याव्यवसायप्रकरणी परदेशी महिलांवर कारवाई
Savitri jindal property and net worth
भारतातील सर्वांत श्रीमंत महिलेचा भाजपात प्रवेश; पती निधनानंतर सांभाळला कोट्यवधींचा उद्योग! संपत्ती वाचून व्हाल थक्क

अशा पध्दतीने या महिलेने अनेक जणांना फसविले आहे. तिच्याकडून १६ मोबाईल, एक परवानाधारी रिव्हाॅल्व्हर, जीवंत काडतुसे, घड्याळे, सोन्याचे दागिने असा एकूण २० लाख ८१ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. समृध्दी संतोष खडपकर (२९, रा. लता कुंज चाळ, निर्मलनगर, खार, मुंबई), विलेंडर विल्फड डिकोस्टा (३४, रा. रुक्मिणी प्लाझा सोसायटी जवळ, पेड म्हापसा, जि. बारदेज, गोवा) या दोन जणांना पोलिसांनी गोव्यातून अटक केली आहे.

डोंबिवलीतील महेश कृष्णा पाटील यांची फेसबुकच्या माध्यमातून गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये समृध्दी खडपकर बरोबर मैत्री झाली होती. समृध्दीने महेश यांना खोणी गावा जवळील एका हाॅटेलमध्ये भोजनासाठी बोलविले. शय्याखोलीत भोजन केल्यानंतर महेश स्वच्छतागृहात गेले. या संधीचा फायदा घेत समृध्दीने महेश यांचे परवानाधारी शस्त्र, मोबाईल, सोन साखळी असा ४ लाख ७५ हजार रुपयांचा ऐवज गुंडाळून पळून गेली. समृध्दीचा कोणताही पत्ता, मोबाईल महेश यांच्याकडे नव्हता. आपण फसलो गेलो आहोत याची जाणीव झाल्यावर महेश पाटील यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली.
या महिलेकडून रिव्हाॅल्व्हरचा गैरवापर होण्याची शक्यता होती. मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक शेखर बागडे यांनी गुन्हे शाखेची पथके तयार करुन महिलेचा शोध सुरू केला. तिचे फेसबुक खाते नियमित हाताळले जाऊ लागले. तिच्या फेसबुकवरुन ती मुंबईतील खार भागात राहत असल्याचे दिसले. पोलिसांनी तेथे खात्री केली ती गोवा येथे राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

हेही वाचा- डोंबिवली एमआयडीसीत मंडप साहित्याला आग, अनोळखी इसमाने आग लावली

पोलिसांनी गोवा राज्यात शोध मोहीम राबवून पेड म्हपसा येथून तिला आरोपी विलेंडर डिकोस्टाच्या घरातून अटक केली. महेशची फसवणूक केल्याची कबुली तिने दिली. फेसबुकच्या माध्यमातून मैत्री करुन आपण अनेकांना फसविले आहे, असे तिने पोलिसांना सांगितले. आपला दर्जा सांभाळण्यासाठी कोणी या फसव‌णुकी विषयी तक्रार करत नव्हता. त्यामुळे समृध्दीचे मनोबल वाढले होते. त्याचा गैरफायदा घेऊन ती सुस्थितीत मंडळींना फसवित होती, असे बागडे यांनी सांगितले. चोरीचे साहित्य ती विलेंडरच्या माध्यमातून बाजारात विकत होती. समृध्दीवर ठाण्यातील नौपाडा, डोंबिवली रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. आतापर्यंत या महिलेने किती जणांना फसविले आहे याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.

हेही वाचा- ठाणे : कल्याणमधील कोळसेवाडीतील शाळा चालकाकडे खंडणीची मागणी

ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, साहाय्यक आयुक्त सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे, साहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील तारमळे, अविनाश वनवे, हवालदार सुशांत तांबे, सुनील पवार, राजेंद्रकुमार खिल्लारे, दीपक गडगे, विकास माळी, शांताराम कसबे, यलप्पा पाटील, देवा पवार, प्रवीण किनरे, बालाजी गरूड, प्राजक्ता खैरनार, अरुणा चव्हाण यांच्या पथकाने केली.