बदलापूर : अमेरिकन इंडिया फाउंडेशन (AIF) तर्फे महाराष्ट्रातील नामांकित आदर्श विद्या प्रसारक संस्था चालवित असलेल्या आदर्श विद्या मंदिर, कुळगाव-बदलापूर (पूर्व) या शाळेला सन्मानचिन्ह प्रदान करून गौरविण्यात आले. इयत्ता ९ वी व १० वी विभागातील गुणवत्तापूर्ण शिक्षण, तसेच शैक्षणिक उपक्रमांतील उल्लेखनीय सहभाग यासाठी हा सन्मान देण्यात आला.
एकआयएफ एवॅन्टर स्टेम (AIF-Avantor STEM ) कार्यक्रम शाळेत यशस्वीपणे राबवण्यात आला असून, या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित (STEM) विषयांविषयी आवड व आत्मविश्वास वाढीस लागला. या कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतल्याबद्दल व गुणवत्ता वृद्धीसाठी केलेल्या प्रयत्नांची दखल घेऊन शाळेसोबतच पर्यवेक्षिका सौ. साधना शेरेकर आणि विज्ञान शिक्षक तुषार पाटील, भाऊ तातळे, हितेश ज्रहाड, प्रदीप बेर्डे, सौ. भक्ती कुलकर्णी यांना बेस्ट कोऑर्डिनेटर टीचर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
शाळेचे मुख्याध्यापक रमेश बुटेरे यांनी सांगितले की, “AIF सारख्या आंतरराष्ट्रीय संस्थेकडून मिळालेला हा सन्मान शाळेसाठी अभिमानाची बाब आहे. हा गौरव उपमुख्याध्यापिका सौ. विद्या जोशी, पर्यवेक्षिका सौ. साधना शेरेकर, सर्व शिक्षकवृंद आणि विद्यार्थ्यांच्या सामूहिक प्रयत्नांचे फलित आहे.”
AIF चे समन्वयक प्रथमेश पवार यांनी कार्यक्रमादरम्यान शाळेची शिस्त, नम्रता व विद्यार्थ्यांच्या हुशारीचे कौतुक करताना सांगितले की, “ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही आधुनिक STEM शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात आदर्श विद्या मंदिर अग्रेसर आहे. इतर मराठी शाळांच्या तुलनेत येथे पटसंख्या वाढत असून, एवढ्या मोठ्या संख्येतही शाळेने आपली गुणवत्ता टिकवून ठेवली आहे.”
शाळेने पुढील काळात असे अनेक नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम राबवण्याचा मानस व्यक्त केला आहे.