शिवसेना नेते आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या ठाणे जिल्ह्याचा आज (२१ जुलै) दौरा केला. ठाणे जिल्ह्यातील पदाधिकारी व माजी नगरसेवकांकडून शिंदेंना समर्थन मिळत आहे. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंनी सर्वात आधी शिवसेनेला पालिकेची सत्ता देणाऱ्या ठाणे शहराचा दौरा केला. तसेच शिवसेना कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या. विशेष म्हणजे या दौऱ्यासाठी भिवंडीला जाताना आदित्य ठाकरेंनी पूर्व द्रुतगती मार्गावर असणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या घरासमोर काही क्षण गाडी थांबवल्याचा प्रकार घडला.

नक्की पाहा हे फोटो >> Photos: एक कोटींच्या भ्रष्टाचार प्रकरणातील वादग्रस्त अधिकारी होणार मुख्यमंत्री शिंदेंचा सल्लागार?

नक्की वाचा >> आदित्य ठाकरेंच्या ‘बंडखोर गद्दार’ टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलं उत्तर; म्हणाले, “त्यांना काय…”

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाण्यात शिवसैनिकांकडून स्वागत
झालं असं की, ठाणे शहरामध्ये आदित्य ठाकरेंच्या ताफ्याने पूर्व द्रुतगती मार्गावरुन आनंदनगर टोल नाका येथे प्रवेश केला. यावेळी आदित्य यांचं स्वागत करण्यासाठी शिवसैनिक आनंदनगर टोल नाक्यावजळ उभे होते. आदित्य यांच्या या दौऱ्यानिमित्ताने ठाणे आणि मुंबईच्या वेशीवर असलेल्या आनंदनगर नाक्यावर त्यांच्या स्वागतानिमित्ताने शिवसैनिकांकडून शक्ती प्रदर्शन करण्यात आले. आदित्य ठाकरेंनी आनंदनगर टोल नाक्यावर समर्थकांकडून शुभेच्छा, पुष्पगुच्छ स्वीकारले आणि ते भिवंडीकडे जाण्यासाठी रवाना झाले.

नक्की वाचा >> शिंदे गटाकडून शरद पवार, अजित पवारांवर का टीका केली जातेय?; रोहित पवार उत्तर देताना म्हणाले, “त्यांच्यावर खापर फोडलं तर…”

…अन् मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर थांबली गाडी
आनंदनगर टोल नाक्यापासून काही अंतर गेल्यानंतर आदित्य ठाकरेंचा ताफा अचानक एकनाथ शिंदे यांचं खासगी निवासस्थान असणाऱ्या लुईसवाडी भागामध्ये थांबला. एकनाथ शिंदेंच्या अगदी घरासमोरुन जाणाऱ्या मार्गावर काही शिवसैनिक आदित्य ठाकरेंना भेटण्यासाठी उभे होते. त्यामुळे त्यांचा ताफा अगदी शिंदे यांच्या घराजवळच थांबला. या ठिकाणी त्यांनी पुष्पगुच्छ देण्यासाठी थांबलेल्या कार्यकर्त्यांची भेट घेतली आणि ताफा पुढे निघाला.

नक्की पाहा >> Photos: “उद्धव आणि आदित्य ठाकरेंच्या आदेशानेच पवारांवर पातळी सोडून टीका”; बापाचा उल्लेख करत अजित पवारांनी इशारा दिलेल्या नेत्याचा गौप्यस्फोट

नक्की वाचा >> “आपणच मुख्यमंत्री आहोत हे एकनाथ शिंदेंना सिद्ध करुन दाखवावं लागेल”

भिवंडीमधील भाषणात बंडखोरांवर टीका
शिवसेनेचा गड मानल्या जाणाऱ्या ठाण्यात शिंदे समर्थकांची संख्या वाढत असल्याने होणारी पडझड रोखण्यासाठी आदित्य ठाकरे हे गुरुवारी सकाळपासूनच ठाणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. भिवंडी व शहापूर येथे आदित्य ठाकरेंच्या ‘शिवसंवाद’ यात्रेच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. भिवंडी येथील भाषणामध्ये त्यांनी “आम्ही शिवसेनेच्या खासदार-आमदारांवर अंधविश्वास ठेवला, तर त्यांनी आमच्याच पाठीत खंजीर खुपसला. जे गेले त्यांच्या रक्तात कधीच शिवसेना नव्हती. आयुष्यभर त्यांच्या कपाळावर गद्दाराचा ठपका असेल”, अशी टीका केली.

नक्की वाचा >> ‘हे सरकार बेकायदेशीर असून लवकरच कोसळणार’ म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री शिंदेंचं उत्तर; म्हणाले, “ज्यांना स्वत:चं…”

ठाण्यामध्ये शिवसेनेत उभी फूट
ठाणे जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मात्र, शिंदे यांच्या बंडखोरीनंतर जिल्ह्यातील सेनेच्या गडाला सुरुंग लागला आहे. शिंदे यांना ठाणे जिल्ह्यातील पदाधिकारी तसेच माजी नगरसेवकांकडून समर्थन मिळत आहे. यामुळे शिवसेनेत उभी फूट पडली आहे. शिवसेनेने अद्याप जिल्हा प्रमुख जाहीर केलेला नाही. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांचा गुरुवारचा ठाणे जिल्ह्याचा दौरा महत्वाचा मानला जातोय.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aditya thackeray convoy stop in front of cm eknath shinde house at thane scsg
First published on: 21-07-2022 at 18:26 IST