ठाणे : मुंब्रा बाह्यवळण मार्गावर खाद्य तेल वाहून नेणारा टॅंकर मध्यरात्री उलटला होता. अखेर सात तासांनंतर म्हणजेच सकाळी १०.३० सुमारास शहरातील वाहतूक कोंडी सुटली. परंतु या कोंडीमुळे अनेकांना वेळेत कामाच्या ठिकाणी पोहचता आले नाही. त्याचा नाहक त्रास कर्मचाऱ्यांवर आणि कार्यालयीन कामकाजावर पडला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा… मुख्यमंत्र्यांचे शहर एका रस्ते अपघाताने झाले ठप्प; पाच मिनिटांच्या अंतरासाठी लागत आहे पाऊण तास

गुजरातहून अंबरनाथच्या दिशेने एक खाद्य तेल वाहून नेणारा टॅंकर निघाला होता. या टॅंकरमध्ये ३३ टन तेल होते. टॅंकर मुंब्रा बाह्यवळण मार्गावर आला असता, वाहन चालकाचा ताबा सुटला आणि टॅंकर रस्त्यावर उलटला. त्यामुळे मोठ्याप्रमाणात तेल रस्त्यावर सांडले. त्यामुळे दोन्ही दिशेकडील वाहतूक थांबविण्यात आली होती. सकाळी ६ वाजताच्या सुमारास यंत्राच्या मदतीने अग्निशमन दलाने रस्त्यावर सांडलेले खाद्यतेल काढले. परंतु या अपघाताचा परिणाम शहरातील वाहतूकीवर झाला. घोडबंदर मार्ग, पूर्व द्रुतगती मार्ग आणि मुंबई नाशिक महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. पाच मिनीटांच्या अंतरासाठी वाहन चालकांना पाऊण तास लागत होता. शाळेच्या बसगाड्याही वाहतूक कोंडीत अडकून बसल्याने विद्यार्थी वेळेत शाळेमध्ये पोहचले नव्हते.

हेही वाचा… डोंबिवली: काँक्रीटीकरण कामासाठी मानपाडा रस्त्यावरील सागाव साईबाबा चौकातून शिळफाटाकडे जाणारा रस्ता लवकरच वाहतुकीसाठी बंद

सकाळी १०:३० वाजताच्या सुमारास येथील वाहतूक सुरळीत झाली. परंतु वाहतूक कोंडीच्या कालावधीत अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडलेल्या नागरिकांचे हाल झाले. अनेकांना वेळेत कामावर पोहचता आले नाही. महिला प्रवाशांचे यामध्ये सर्वाधिक हाल झाले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After 7 hours traffic jam in thane city is cleared now asj
First published on: 12-12-2022 at 12:18 IST