scorecardresearch

Premium

ग्रंथाभिसरण वाचनालयाचा अमृत महोत्सवी सोहळा, अंबरनाथ येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

अंबरनाथ शहराच्या सांस्कृतिक जडघडणीत मोलाची भूमिका बजावणाऱ्या ग्रंथाभिसरण सार्वजनिक वाचनालयाचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करण्यात येत आहे.

granthabhisaran library ambernath, amrit mahotsav celebration granthabhisaran library
ग्रंथाभिसरण वाचनालयाचा अमृत महोत्सवी सोहळा, अंबरनाथ येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन (प्रातिनिधिक छायाचित्र)

ठाणे : अंबरनाथ शहराच्या सांस्कृतिक जडघडणीत मोलाची भूमिका बजावणाऱ्या ग्रंथाभिसरण सार्वजनिक वाचनालयाचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करण्यात येत आहे. या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त १ ते ३ डिसेंबर असे तीन दिवसीय विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अंबरनाथ पूर्व येथील रोटरी क्लब सभागृहात हे सांस्कृतिक कार्यक्रम पार पडणार आहेत. या कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे ग्रंथाभिसरण मंडळ सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे.

अंबरनाथ येथे असणारे ग्रंथाभिसरण मंडळ सार्वजनिक वाचनालय शहरातील सर्वात जुने वाचनालय म्हणून ओळखले जाते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुरस्काराने सन्मानित “अ तालुका” दर्जा प्राप्त हे ग्रंथालय शहरातील एकमेव ग्रंथालय आहे. या ग्रंथालयात महत्त्वपूर्ण व दुर्मिळ संदर्भ ग्रंथासह सुमारे ४२ हजार ग्रंथसंख्या तसेच १०० च्या नियतकालिके आहेत. तसेच होतकरू व गरजू विद्यार्थ्यांसाठी नाममात्र शुल्कांत अभ्यासिकेची सोय व मोफत इंटरनेट सेवाही ग्रंथालयाच्या मार्फत पुरविण्यात येते. मराठी,हिंदी व इंग्रजी भाषेतील एकूण १२ वर्तमान पत्रे दररोज संस्थेत उपलब्ध असतात. ग्रंथालयाचे यंदाचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

PM Narendra Modi
“अमूल जैसा कोई नहीं!”, गुजरातमध्ये नरेंद्र मोदींचं विधान चर्चेत, तर आव्हाडांचा ‘महानंद’बाबत मोठा दावा!
Bhoomipujan of various development works in Uran by Rural Development Minister Girish Mahajan
ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याहस्ते उरणमधील विविध विकास कामांचे भूमिपूजन
Thane Home Festival
यंदा ठाण्याच्या गृहउत्सवात शंभरहून अधिक प्रकल्प, क्रेडाई-एमसीएचआय संस्थेचे मालमत्ता प्रदर्शन
bjp hindutva agenda implemented through cultural programs
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात धार्मिक कार्यक्रमांचीही रेलचेल

हेही वाचा : वीज चोरी करत असाल तर सावधान; होऊ शकतो गुन्हा दाखल

यामध्ये १ डिसेंबर रोजी ज्येष्ठ वक्ते डॉ. सच्चिदानंद शेवडे यांचा भारतीयांचा प्राचीन ज्ञान खजिना या विषयावर व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तर २ डिसेंबर रोजी जीवनशैली बदलातून वजन कमी करणे आणि मधुमेह मुक्ती विषयावर डॉ. जगन्नाथ दीक्षित आणि ३ डिसेंबर रोजी दिपाली केळकर या शब्दांच्या गावा जावे हा कार्यक्रम सादर करणार आहे. अंबरनाथ पूर्व येथील रोटरी क्लब सभागृहात सायंकाळी ५.३० वाजत हे सर्व कार्यक्रम पार पडणार आहेत. या सर्व कार्यक्रमांना नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन वाचनालयाचे अध्यक्ष प्रवीण मथुरे यांनी केले आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Amrit mahotsav celebration of granthabhisaran library organizing various cultural programs at ambernath css

First published on: 28-11-2023 at 18:51 IST

आजचा ई-पेपर : ठाणे

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×