ठाणे: तुम्ही वीज चोरी करत असाल तर सावधान कारण तुमच्यावर थेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊ शकतो. ठाण्यात ८७ हजार रुपयांच्या वीज चोरीप्रकरणी सोमवारी नौपाडा पोलीस ठाण्यात महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी भारतीय विद्युत अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काही महिन्यांपूर्वी महावितरण कंपनीच्या पथकाकडून ठाण्यात ग्राहकांच्या विद्युत पुरवठ्याच्या तपासणी सुरू होती. पथकाने नौपाडा येथील बी केबीन भागातील एका ५५ वर्षीय व्यक्तीचे विद्युत देयक (बील) तपासले असता, त्यांचे देयक वीज वापरापेक्षा कमी येत असल्याचे आढळून आले. त्यामुळे पथकाने त्यांच्या येथील विद्युत मीटरमधील तारांची पाहणी केली. त्यामध्ये कोणताही फेरफार आढळून आला नाही. परंतु त्या तारा काढल्यानंतरही घरातील विद्युत पुरवठा सुरूच असल्याचे आढळून आले. त्यानंतर पथकाने त्यांच्या घराची तपासणी केली.

SIMI, 2008 Malegaon blasts,
२००८ सालच्या मालेगाव बॉम्बस्फोटामागे सिमीचा हात, साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचा विशेष न्यायालयात दावा
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
anganwadi workers announce chakka jam protest on 1 october across maharashtra
राज्यातील अंगणवाडी सेविका १ ऑक्टोबरला करणार चक्का जाम
woman of Chandrapur cheated, Online share purchase,
ऑनलाईन शेअर्स खरेदी : चंद्रपूरच्या उच्चशिक्षित महिलेची ७४.५० लाखांनी फसवणूक
Accused absconding for 20 years ,
२० वर्षे फरार आरोपी अटकेत
2 crore fraud with company, fake invoices fraud,
मुंबई : बनावट पावत्यांद्वारे कंपनीची पावणेदोन कोटींची फसवणूक
12 lakh fraud by cyber thieves Pune news
मुंबई उच्च न्यायालयाकडून अटक वाॅरंटची बतावणी; सायबर चोरट्यांकडून एकाची १२ लाखांची फसवणूक
Murder of petrol pump owner of Virar two accused arrested by crime branch team
विरारच्या पेट्रोलपंप मालकाची हत्या, गुन्हे शाखेच्या पथकाकडून दोन आरोपींना अटक

हेही वाचा… कल्याण डोंबिवली पालिकेच्या कामगारावर जीवघेणा हल्ला

विद्युत तारांमध्ये फेरफार करून वीज चोरी सुरू असल्याचे आढळून आले. त्यानंतर पथकाने संबंधित व्यक्तीविरोधात विद्युत कलम १३५ अंतर्गत वीजचोरीची कारवाई केली होती. तसेच त्याचा विद्युत पुरवठा खंडीत केला होता. या व्यक्तीने सुमारे वर्षभरात ८७ हजार ९६२ रुपयांची वीजचोरी केल्याचे स्पष्ट झाले. यासंदर्भात तडजोड रक्कम भरण्यास महावितरणच्या अधिकाऱ्यांनी त्या व्यक्तीस वारंवार संपर्क साधला. परंतु त्याने तडजोड रक्कम भरली नाही. याप्रकरणी महावितरण कंपनीच्या साहाय्यक अभियंत्याने दिलेल्या तक्रारीच्या आधारे नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.