कल्याण – देशातील हिंदू धर्माची अनेक वर्षांची विविध धार्मिक स्थळे विविध जोखडांमधून मुक्त केली जात आहेत. अशाच पद्धतीने अनेक वर्षे विविध प्रक्रियेत, निर्णयात अडकून पडलेले कल्याण जवळील मलंगगड देवस्थान मुक्त करण्यासाठी हिंदू धर्माभिमानी, संत, महंत, नेते, मंत्री गणांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन मलंगगडाच्या पायथ्याशी नेवाळी पाडा येथील मैदानावर रविवारी आयोजित धर्मसभेत करण्यात आले.

अयोध्येत बाबरी मस्जिद पाडून राम मंदिर उभारले जात आहे. अफझलखानाची कबर उखडून टाकण्यात आली. काशी येथे भव्य प्रशस्त भाविक मार्ग उभारला गेला आहे. अशाच पद्धतीने श्री मलंगगडावरील मच्छिंद्रनाथ यांची समाधी मुक्त करण्यासाठी सर्व हिंदू धर्माभिमांनी पुढाकार घ्यावा. राज्यात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचाराने चालणारे सरकार कार्यरत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेऊन मलंग मुक्तीची हिंदू भाविकांची इच्छा पूर्ण करावी. या परिसराचा विकास करावा, असे आवाहन श्रीराम युवा सेनेचे अध्यक्ष राजा सिंह ठाकूर यांनी केले.

हेही वाचा – कल्याणमध्ये वादळी वाऱ्यामुळे झाडे कोसळली

या कार्यक्रमाला नाणीजचे नरेंद्रनाथ महाराज, संत तुकाराम महाराज यांच्या घराण्याचे वंशज शिरिष मोरे, स्वामी भारतानंद सरस्वती, महेंद्र वेदक उपस्थित होते. सकल हिंदू समाजतर्फे नेवाळी पाडा येथील मैदानावर श्री मलंग जागरण धर्मसभेचे आयोजन करण्यात आले होते. हजारो हिंदू भाविका यावेळी उपस्थित होते. मलंगगडाच्या मुक्तीसाठी अनेक वर्षे झगडावे लागते हे दुर्भाग्य आहे. चुकीचा इतिहास उभा करून हे सगळे रेटले जात आहे. ३७० किल्ल्यांपैकी २५ किल्ल्यांवर दर्गा, मस्जिद उभ्या राहिल्या आहेत. याच किल्ल्यांवर भगवा झेंडा फडकविला की मात्र गुन्हे दाखल केले जातात, असे ठाकूर यांनी सांगितले.

हेही वाचा – एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी धुळवड; नैसर्गिक रंगाचा वापर करून सण साजरा करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मलंगगडाचा विषय कोकणापुरता मर्यादित नाही. तो देशाचा विषय आहे. त्यामुळे राजकारण बाजुला ठेऊन विद्यमान सरकारांनी हा विषय मार्गी लावण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन सरस्वती महाराज यांनी केले. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, खा. डाॅ. श्रीकांत शिंदे उपस्थित होते.