कल्याण- सोमवारी संध्याकाळी अचानक आलेल्या वादळी वाऱ्यांमुळे कल्याण, डोंबिवली शहरांच्या अनेक भागात झाडे उन्मळुन पडली. काही ठिकाणी रस्त्यांवर लावण्यात आलेल्या कमानी कोसळल्या. जीवित हानी झाली नसल्याचे अग्निशमन अधिकाऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा >>> डोंबिवलीत आयरे गाव हरितपट्ट्यातील बेकायदा बांधकामांना नोटिसा, बांधकामे जमीनदोस्त करण्याचे आदेश

सोमवारी दिवसभर आकाश ढगाळले होते. दुपारनंतर वादळी वाऱ्यांबरोबर धुळीचे लोट शहरात पसरले. वादळी वाऱ्यांमुळे काही ठिकाणी घरांवरील पत्रे उडाले. जुनाट झाडे मुळासकट उन्मळून पडली. कल्याण मधील खडेगोळवली, मल्हानगर भागात झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या. मल्हारनगरमध्ये नारळाचे झाड एका घरावर पडले.

हेही वाचा >>> कल्याण डोंबिवली पालिकेत सफाई कामगारांकडून आयुक्तांचे आदेश दुर्लक्षित

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डोंबिवलीत ठाकुर्ली उड्डाण पुलाजवळ लोखंडी बांधणीची एक जाहिरातीची कमान वादळी वाऱ्याने निखळून पडली. सुदैवाने या भागातून वाहन जात नव्हते. अन्यथा कमान वाहनवर कोसळली असती. खाडी किनारी भागात दुपारनंतर फिरण्यासाठी गेलेल्या नागरिकांना धूळ, उडून आलेल्या कचऱ्याचा सामना करावा लागला. होळीचे सामान खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिक, व्यापाऱ्यांना वादळी वाऱ्यांचा फटका बसला.