ठाणे : आनंद दिघे हे शेवटच्या श्वासापर्यंत शिवसेनेसाठी झटत होते. त्यांना टाडा लागल्यानंतरही त्यांनी अडीच वर्ष तुरुंगात काढली. परंतु ते कोणाच्या पायाशी गेले नाही. त्यामुळे दिघे साहेब यांची जागा कोणीही घेऊ शकत नाही. असा टोला खासदार राजन विचारे यांनी शिंदे गटाला लगावला. तसेच आम्हीच खरी शिवसेना असल्याचा उच्चार त्यांनी केला.

शुक्रवारी शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या पुण्यतिथी निमित्ताने राजन विचारे हे टेंभीनाका येथे आले होते. त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. आनंद दिघे हे आमच्यासाठी दैवत आहे. प्रत्येक शिवसैनिकाच्या घरामध्ये आनंद दिघे यांची पूजा केली जाते. आनंद दिघे हे शेवटच्या श्वासापर्यंत शिवसेनेसाठी झटत होते. त्यांना टाडा लागल्यानंतरही त्यांनी अडीच वर्ष तुरुंगात काढली. परंतु ते कोणाच्या पायाशी गेले नाही. गद्दारांना क्षमा नाही, या विधानातून त्यांनी माघार घेतली नाही.

हेही वाचा : घोडबंदर भागात पाणी टंचाईची समस्या लवकरच सुटेल ; पालिका प्रशासनाने दिले बैठकीत आश्वासन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यामुळे दिघे साहेब हे दिघे साहेब आहेत. त्यांची जागा कोणीही घेऊ शकत नाही. असा टोला त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाला लगावला. आम्ही खरे शिवसैनिक आहोत. असा उच्चारही त्यांनी केला. राज्यात जे काही सुरू आहे. ते उघड्या डोळ्यांनी जनता बघत आहे. त्यामुळे त्याचा हिशोब जनताच करेल. अशी टिकाही त्यांनी केली.