तबला वादन शिकणाऱ्या एका १३ वर्षाच्या विद्यार्थ्याची सोन्याची साखळी लुबाडून रिक्षा चालकाने पळ काढल्याचा प्रकार डोंबिवली पश्चिमेतील बावन चाळ परिसरात घडली. विद्यार्थ्याने घरी आल्यावर घडला प्रकार वडिलांना सांगितला. वडिलांच्या तक्रारीवरून विष्णुनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून रिक्षा चालकाचा शोध सुरू केला आहे.

पोलिसांनी सांगितले, डोंबिवली पश्चिमेतील देवी चौकात जाईबाई निवासमध्ये राहणारे मोहन बाळाराम भोईर (३८) यांचा मुलगा साई तबला वादन प्रशिक्षणासाठी दररोज संध्याकाळी सहा वाजता भागाशाळा मैदानजवळ जातो. रात्री आठ वाजता तो रिक्षेने घरी परत येतो. साई भोईरने गुरूवारी नेहमीप्रमाणे शिकवणी संपून घरी जाण्यासाठी एका रिक्षा चालकाला थांबविले. आपणास देवी चौकातील राम मंदिर येथे जायाचे आहे असे त्याने चालकाला सांगितले. साईच्या गळ्यात सोनसाखळी असल्याने आणि साई लहान असल्याने तो प्रतिकार करणार नाही, असा विचार करून रिक्षा चालकाने साईच्या गळ्यातील सोनसाखळी लुटण्याच्या विचाराने रिक्षा देवी चौकाकडे न नेता ठाकुर्ली पुलाकडील बावनचाळ अडगळीच्या भागात नेली.

Mohammed Abdul Arfath found dead in US
अमेरिकेत मुलाचा मृत्यू, डोक्यावर ४३ लाखांचे शैक्षणिक कर्ज; भारतीय विद्यार्थ्याच्या कुटुंबाची करुण कहाणी
Rat case Sassoon hospital, Rat case,
ससूनमधील ‘उंदीर’ प्रकरणात दोषी कोण? अखेर सत्य येणार बाहेर
Death of two brothers
पाण्याच्या टाकीत पडून दोन भावांचा मृत्यू: दाम्पत्यावर दुःखाचा डोंगर कोसळला असताना लगेचच झोपडीवरही कारवाई, न्यायालयाने घेतली दखल
youth dies
मस्करी जीवावर बेतली; कम्प्रेसरच्या सहाय्याने मित्राच्या गुदद्वारात हवा भरली, तरूणाचा दुर्दैवी मृत्यू

आपणास देवी चौकात जायाचे आहे. तुम्ही चुकीच्या रस्त्याने जात आहात असे साईने रिक्षा चालकाला सांगितले. चालकाने आपणास एकेठिकाणी मित्राला सोबत घ्यायचे असे खोटे कारण सांगून रिक्षा बावनचाळ भागात नेली. तेथे रिक्षा चालकाने साईला बोलण्यात गुंतवून त्याच्या गळ्यातील सोनसाखळी काढून घेतली. ही सोनसाखळी मी तुझ्या आई्च्या हातात देतो असे सांगून चालकाने रिक्षा पुन्हा देवीचौकाकडे नेली. रिक्षा चालकाच्या मनात काळेबेरे आहे असा संशय साईला आला. त्याने मोबाईलवरून घरी संपर्क करून रिक्षा चालक अनावश्यक आपणास अन्य भागात फिरवत आहे असे कळविले. हे बोलणे रिक्षा चालकाने ऐकले.

आपण पकडले जाऊ या भीतीने रिक्षा चालकाने इतर भागात रिक्षा नेण्याचा प्रयत्न केला. यावेळी साईने चालकाला रिक्षा थांबविण्यास सांगितले. चालक ऐकत नव्हता. शेवटी साईने धावत्या रिक्षेतून उडी मारली. यावेळी चालकाने साईच्या हातामधील मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला. मोठ्या शिताफाईने साईने रिक्षा चालकाच्या तावडीतून स्वताची सुटका करून घेतली.रिक्षा चालक पळून गेला. घरी आल्यावर घडला प्रकार त्याने वडिलांना सांगितला.

मुलगा साईच्या गळ्यातील ४५ हजार रूपये किंमतीची १५ ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी रिक्षा चालकाने लांबविल्याचा दावा करणारी फिर्याद मोहन भोईर यांनी विष्णुनगर पोलीस ठाण्यात केली. रिक्षा चालकाच्या डाव्या हातावर टॅट्यू गोंदले असे तक्रारीत म्हटले आहे. या घटनेचा तपास करण्यात येत आहे. घटनास्थळी सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने चित्रीकरण उपलब्ध नाही. त्यामुळे नक्की काय प्रकार आहे, हे आत्ताच सांगता येत नाही. तपासाअंती सत्य बाहेर येईल. या प्रकरणी जमादार सुभाष नलावडे अधिक तपास करत असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ भालेराव यांनी सांगितले.