ठाणे: अंतर्मुखता आणि बहिर्मुखता यामध्ये माणसाला समतोल साधता येणे महत्त्वाचे आहे. माणसाला त्याच्यातील आतल्या ‘मी’ ला बाहेरच्या ‘मी’ सोबत जोडण्यासाठी बर्हि:मुख होता आले पाहिजे आणि आतल्या ‘मी’ सोबत अंतर्मुख होता आले पाहिजे, असे मत मनोविकारतज्ज्ञ डाॅ. आनंद नाडकर्णी यांनी मांडले.

जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त ठाणे महापालिका आयोजित विचारमंथन या व्याख्यानमालेचे दहावे पुष्प मनोविकारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांच्या मुलाखतीने गुंफले. डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे ‘या मी मी च काय करायचं’ या विषयावर डॉ. आनंद नाडकर्णी यांच्याशी निवेदिका हर्षदा बोरकर यांनी संवाद साधला. यावेळी ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या हस्ते डॉ. आनंद नाडकर्णी, निवेदिका हर्षदा बोरकर यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी आणि अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे उपस्थित होते.

हेही वाचा >>> राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे डोंबिवलीत विधी महाविद्यालय

माणसाची त्याच्यातील आतल्या ‘मी’ सोबत मैत्री व्हावी यासाठी मानसशास्त्र आणि अध्यात्म दोन्ही काम करत आहेत. माणसाचा आतल्या ‘मी’ सोबत चांगला संवाद झाला तर, माणूस हा प्रगतीकडे जात असतो. माणूस हा निसर्गाचाच भाग आहे, माणसांकडे निरिक्षणासाठी असलेली दृष्टी जर त्याने योग्य पध्दतीने वापरली तर, माणूस निसर्गाकडून खूप काही शिकू शकतो, असे डॉ. नाडकर्णी यांनी सांगितले.

हेही वाचा >>> देवीच्या दरबारात चुकीचे वागणाऱ्यांचा देवी वध करेल – खासदार राजन विचारे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

माणसातील गुणवैशिष्ट्य बाहेर काढणारी माणसे आजूबाजूला असणे आवश्यक आहे. अंगभूत क्षमता, संस्कार, संस्कृती या तिघांच्या सहयोगातून जे तयार होते ते माणसाचे वैशिष्ट्य असते. आपण सगळे आपापल्या ठिकाणी वेगळे आहोत. माणूस आपल्यातील ‘वेगळेपण’ समजून न घेता एकमेकांशी स्पर्धा करणे हा ‘मी’ चा भाग असल्याचे डॉ. आनंद नाडकर्णी यांनी नमूद केले. जेव्हा मी मी भांडायला लागतो, तेव्हा लोकं मी स्पेशल का तू स्पेशल अशी भावना निर्माण होते. माणसाने स्वत:तील आणि समोरच्या माणसामधील ‘वेगळेपणा’चाही सन्मान करायला हवा, असे त्यांनी यावेळी सांगितले.