लोकसत्ता प्रतिनिधी

ठाणे: राज्यात सुरु असलेल्या घडामोडीनंतर राज आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे याची चर्चा रंगू लागली असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातही आता राज – उद्धव यांच्या समर्थनार्थ दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी फलक उभारले आहे. महाराष्ट्राला तुमची गरज आहे, बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्याची हीच वेळ आहे… साहेब एकत्र या.. असा मजकूर या फलकावर आहे.

भाजप, अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि शिंदे यांची शिवसेनेना सत्तेत असताना उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांनी एकत्र यावे अशी चर्चा रंगू लागली आहे. मनसे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्ते तशी कुजबुज करू लागले आहेत. मंगळवारी या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन पाचपाखाडी भागात दोन्ही ठाकरे एकत्र यावे यासाठी फलक बसविले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आणखी वाचा-शिंदे जर मुख्यमंत्री असतील तर मला मंत्रीपदही नको, आमदार दौलत दरोडा यांचा खळबळजनक दावा

‘महाराष्ट्राला तुमची गरज आहे, बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्याची हीच वेळ आहे… आम्हाला महाराष्ट्रात फक्त ‘ठाकरे सरकार’ हवे आहे…. साहेब एकत्र या.. असे या फलकावर लिहिले आहे. तसेच त्यावर मध्यभागी बाळासाहेब आणि दोन्ही बाजूला उद्धव आणि राज ठाकरे यांचे छायाचित्र आहे. हे फलक सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.