ठाणे – मुंबई-नाशिक महामार्गावर साकेत आणि खारेगाव खाडी पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याने या मार्गावर वाहतुकीचा भार वाढून मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. साकेत पूल ते मानकोली पुलापर्यंत ही वाहतूक कोंडी झाल्याने ठाण्याच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या नागरिकांचे कोंडीत हाल झाले आहे.

ठाण्यात श्रमजीवी संघटनेचा मोर्चा आहे, त्यामुळे या वाहनांचाही भार या मार्गावर वाढल्याने वाहतूक कोंडीत भर पडली. मुंबई नाशिक महामार्गावरील साकेत आणि खारेगाव खाडे पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. त्यामुळे दररोज वाहतूक कोंडीचा सामना येथील वाहन चालकांना सहन करावा लागतो.
मंगळवारी दुपारी या मार्गावर वाहनांचा भार वाढल्याने साकेत पूल ते मानकोली नाक्यापर्यंत वाहतूक कोंडी झाली आहे.

हेही वाचा – कल्याण : शिळफाटा रस्त्यावरून दिवसा अवजड वाहनांची चोरटी वाहतूक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ठाण्यात श्रमजीवी संघटनेचा मोर्चा आहे. त्यामुळे मोर्चात सहभागी होण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील आदिवासी ट्रक टेम्पोच्या सहाय्याने ठाण्यात दाखल होत आहेत. ही वाहने वाहतूक कोंडीत अडकली आहेत.