भाईंदर : अभियंत्यांना मारहाण करणार्‍या वादग्रस्त आमदार गीता जैन यांनी वाढदिवसानिमित्त पालिका मुख्यालयातील शौचलायाची स्वच्छता केली. यावेळी त्यांनी छायाचित्रकारांना सोबत नेऊन छायाचित्रे समाजमाध्यमवार प्रसारीत केली. जैन यांची ही स्टंटबाजी असल्याची टीका विरोधकांनी केली आहे.

भाईंदरच्या अपक्ष आमदार गीता जैन नेहमी चर्चेत असतात. नुकतीच त्यांनी भर रस्त्यात एका अभियंत्याला मारहाण केली होती. बुधवारी त्यांनी आपला वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला. विविध सामाजिक उपक्रम राबविण्याबरोबरच त्यांनी पालिका मुख्यालयातील शौचालयाची स्वच्छता केली. महिला आमदार चक्क शौचालयाची स्वच्छता करत असल्याने सर्वत्र चर्चेचा विषय बनला होता, मात्र जैन यांनी हा प्रसिद्धीचा स्टंट केला असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.

हेही वाचा – ठाणे: जादा परताव्याचे आमीष दाखवून १५० गुंतवणूकदारांची फसवणूक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

छायाचित्रकार सोबत नेऊन प्रसिद्धी मिळविण्याचा हा अटट्हास असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. पालिका मुख्यालयातील शौचालयाची सफाई करण्यासाठी सफाई कर्मचारी आहेत. त्यामुळे स्वच्छ शौचालयाची केवळ प्रसिद्धीसाठी सफाई केल्याचा आरोप करण्यात येत आहे. दोन वर्षांपूर्वी करोना बाधित असताना जैन यांनी कुटुंबीयांसोबत केक कापल्याने त्या चर्चेत आल्या होत्या.