ठाणे : ज्या झाडाला फळ येतात त्याच झाडावर दगड मारले जातात. मात्र ज्या झाडाला फळ नसतील आणि दगड मारले जातात त्याला काय म्हणतात हे सर्वांना माहीत आहे, अशी टीका मुरबाड मतदार संघाचे आमदार किसन कथोरे यांनी रविवारी वांगणी येथे त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या आरोग्य शिबिरांत केली. मागील काही दिवसांपूर्वी त्यांच्या बदनामी करिता प्रसारित करण्यात आलेल्या व्हिडीओ बाबत बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

हेही वाचा >>> मुंबई, ठाण्यात वाहतूक कोंडीचे विघ्न; गणेश मिरवणुका, खरेदीची लगबग

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वांगणी येथे आमदार किसन कथोरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत आरोग्य शिबीराचे आयोजन केले होते. त्यावेळी आमदार किसन कथोरे यांनी काही दिवसांपूर्वी प्रसारित झालेल्या व्हिडिओ बाबत आपले मत व्यक्त केले. ज्या झाडाला फळ येतात त्याच झाडावर दगड मारले जातात. पण ज्या झाडाला फळ येत नाही त्यावर दगड मारणाऱ्यास काय म्हणतात, हे सर्वांना माहित आहे असा टोला त्यांनी यावेळी लगावला आहे.  तसेच त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या मतदार संघात सुकन्या योजना राबवली जाणार आहे. यामध्ये ज्या घरी मुलगी जन्मास येईल त्या मुलीचे कार्यकर्त्यांनी तिच्या घरी जाऊन स्वागत करावे. नवजात बाळासाठी आवश्यक सामान उपलब्ध करून देत तिचे सुकन्या योजनेत खाते तयार करावे असे देखील त्यांनी सांगितले आहे. खाते तयार केलेल्या मुलीचे सर्व हफ्ते भरले जातील असे देखील त्यांनी स्पष्ट केले. मतदार संघातील मुलींचा जन्मदर वाढवण्याकरिता हा उपक्रम राबवला जाणार आहे.