scorecardresearch

दिव्यात भाजपाला मोठा धक्का; हजारो पदाधिकाऱ्यांसह निलेश पाटील करणार शिवसेनेत प्रवेश

दिव्यात १५ दिवसात भाजपाला दुसरा धक्का

BJP, Nilesh Patil, Shivsena
दिव्यात १५ दिवसात भाजपाला दुसरा धक्का

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर फोडाफोडीचे राजकारण सुरू झाले आहे. भाजपाचे आदेश भगत यांच्यापाठोपाठ दिवा शहर अध्यक्ष निलेश पाटील हे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. यामुळे दिव्यात भाजपाला मोठा धक्का मानला जात आहे.

तत्कालीन भाजपा दिवा मंडळ अध्यक्ष आदेश भगत यांनी स्वर्गीय आनंद दिघे यांच्या जयंतीदिनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला होता. भगत सेनेत जाणार असल्याची कुणकुण लागताच एक दिवसआधीच भाजपाचे ठाणे शहराध्यक्ष निरंजन डावखरे यांनी निलेश पाटील यांची दिवा मंडळ अध्यक्ष पदी निवड केली होती. त्यानंतर निलेश यांच्या सत्काराचे कार्यक्रमही दिव्यात घेण्यात आले होते. मात्र नियुक्ती होऊन १५ दिवस होत नाहीत तोच दिव्यात शिवसेनेने भाजपाला धक्का दिला आहे. मंगळवारी निलेश हे हजारो भाजपा पदाधिकाऱ्यांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश करत आहेत. दिव्यात भाजपाला १५ दिवसातील हा शिवसेनेने दिलेला दुसरा धक्का आहे.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bjp nilesh patil to join shivsena diva thane sgy

ताज्या बातम्या