डोंंबिवली – आगामी लोकसभा निवडणुकीचा भाग म्हणून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे शनिवार, रविवारी कल्याण, भिवंडी लोकसभा मतदारसंघाचा दौरा करणार आहेत. या संपर्क अभियानाच्या माध्यमातून प्रदेशाध्यक्ष स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिकांशी विकास कामांच्या विषयावर संवाद साधणार आहेत, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली.

भिवंडी लोकसभा मतदारसंघात मुरबाडचे आमदार किसन कथोरे आणि भिवंडी लोकसभेचे खासदार तथा केंद्रीय मंत्री कपील पाटील यांच्यात मागील काही महिन्यांपासून शीतयुद्ध सुरू आहे. या शीतयुद्धामुळे भाजपाचे भिवंडी लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्ते नाराज आहेत. या शीतयुद्धाची बावनकुळे कशी सांगता करतात याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.

हेही वाचा – सत्ता असूनही पोलिसांचा दुजाभाव; कल्याणमधील पदाधिकाऱ्यांचे फडणवीस यांच्यापुढे गाऱ्हाणे

हेही वाचा – ठाणे जिल्ह्यात सगुणा तंत्रज्ञानाने पेरलेल्या भात उगवणीत भेसळयुक्त लोम्बी, शेतकऱ्यांची चिंता वाढली

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शनिवारी बावनकुळे शहापूर, मुरबाड, भिवंडी भागातील कार्यकर्त्यांची संघटनात्मक बैठक घेणार आहेत. कल्याणमध्ये अहिल्याबाई चौक ते टिळक चौक दरम्यान घर चलो अभियानात ते सहभागी होणार आहेत. रविवारी ते कल्याण लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या डोंबिवलीत बैठका घेणार आहेत. इंदिरा चौक ते गणेश मंदिर दरम्यान ते घर चलो अभियानात सहभागी होणार आहेत. उल्हासनगर येथेही अशाच कार्यक्रमात बावनकुळे सहभागी होतील. कोअर कमिटीची रात्री शेवटची बैठक होणार आहे. त्यात आगामी निवडणुकांच्या विषयावर चर्चा होईल, असे मंत्री चव्हाण यांनी सांगितले.