कल्याण :  राज्यात आपली सत्ता आहे. गृहमंत्री पदही भाजपकडे आहे. असे असूनही कल्याण डोंबिवलीत मात्र पोलीस आमच्यावर अन्याय करतात, दुजाभावाची वागणूक देतात. यात लक्ष घाला. कार्यकर्ते हैराण आहेत, अशा शब्दांत कल्याण डोंबिवलीतील भाजप पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गाऱ्हाणे मांडले. याविषयी  लक्ष घालू असे आश्वासन फडणवीस यांनी या पदाधिकाऱ्यांना दिल्याचे समजते. 

हेही वाचा >>> ठाणे : सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांची मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर घोषणाबाजी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कल्याण पूर्वचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या निवासस्थानी फडणवीस यांनी भेट दिली. त्यावेळी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी अनेक तक्रारी त्यांच्या कानावर घातल्या. फडणवीस यांचे आमदार गायकवाड, नरेंद्र सूर्यवंशी यांनी स्वागत केले. भाजप कल्याण जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी यांनी वडवली भागात एका भाजप कार्यकर्त्यांवर जीवघेणा हल्ल्याचे प्रकरण कानावर घातले. या प्रकरणी गुन्हा दाखल होऊनही पोलीस संबंधित हल्लेखोरांना अटक करत नाहीत, अशी तक्रार सूर्यवंशी यांनी या वेळी केली. आम्हाला कल्याण डोंबिवलीत पोलिसांकडून नेहमीच अशीच वागणूक मिळते. भाजप कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांविषयी दुजाभावाची भूमिका पोलीस घेतात. त्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांचे मनोबल खच्ची होत असल्याच्या तक्रारीही या वेळी फडणवीस यांच्यापुढे मांडण्यात आल्याचे सांगितले जाते.