डोंबिवली – ब्राम्हण बिझनेस नेटवर्क ग्लोबलतर्फे डोंबिवलीत येत्या रविवार, सोमवारी देशभरातील विविध प्रांतांमधील ब्राम्हण ज्ञातीमधील उद्योजकांची परिषद आयोजित करण्यात आली आहे. देशभरातून ९०० उद्योजक, नवउद्योजक, उद्योजकतेमध्ये येणारे होतकरू या परिषदेला उपस्थित राहणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती परिषदेत असणार आहे, अशी माहिती बीबीएन नेटवर्क ग्लोबल संस्थेचे सहयोगी संचालक व उद्योजक अरविंद कोऱ्हाळकर यांनी दिली.

डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले रंगमंदिरात ही दोन दिवसांची परिषद होणार आहे. विदेशातून काही ब्राम्हण उद्योजक या परिषदेला उपस्थिती लावणार आहेत. परिवर्तन या शीर्षकाखाली होणाऱ्या या परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकल ते ग्लोबल ही संकल्पना, त्या आधारे उद्योग, व्यवसायांमधील माहितीचे आदान प्रदान, नव उद्योजकांना व्यवसायात येण्यासाठी लागणारे मार्गदर्शन, भांडवल उभारणी, उत्पादित मालाची देवाण घेवाण, दर्जेदार निर्मिती, त्याचा प्रसार हा या परिषदेचा मुख्य उद्देश आहे, असे सहयोगी संचालक कोऱ्हाळकर यांनी सांगितले.

हेही वाचा – “वडिलांची उणीव भासते आहे”, लक्ष्मण जगताप यांच्या कन्येचे भावनिक आवाहन; म्हणाल्या, “ज्या प्रमाणे वडिलांवर..”

अनुभवी उद्योजक, त्यांचे व्यवसायातील अनुभव, मार्गदर्शन, बदलत्या माहिती तंत्रज्ञानामुळे उद्योग व्यवसायाचे बदलते रूप, त्याचा होत असलेला फायदा, नवउद्यमींना स्थानिक व विदेशात नवीन बाजारपेठा खुणावत आहेत. हे व्यवसाय अधिक वृद्धिंगत होण्यासाठी ब्राम्हण ज्ञातीमधील उद्योजकांनी साखळी पद्धतीने काम करणे कसे गरजेचे आहे. नवीन ग्राहक मिळविण्यासाठी होणारी स्पर्धा. आपल्या ज्ञातीमध्ये उद्योजक, ग्राहक आणि उत्पादित मालाचा प्रचार, विक्री अशी नवीन साखळी तयार करता येईल का, अशा अनेक अंगाने या परिषदेत चर्चा होणार आहे.

हेही वाचा – पुण्यात खराडीमध्ये बांधकाम प्रकल्पात सुरुंगाचा स्फोट, मजुराचा मृत्यू, एक जखमी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्रीपाद कुलकर्णी यांनी ब्राम्हण उद्योजकांची एक साखळी असावी या विचारातून बीबीएनजी संस्थेची स्थापना केली आहे. दरवर्षी संस्थेच्या विविध भागांत उद्योजक परिषदा, बैठका होतात. यावेळचा मान डोंबिवलीला मिळाला आहे. ही परिषद यशस्वी करण्यासाठी संस्थेचे डोंबिवली विभागातील ब्राम्हण उद्योजक प्रयत्नशील आहेत.