राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर त्यांच्या पत्नी ऋता आव्हाड यांनी ट्वीटरवरुन पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे. आव्हाड यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा नोंदवण्यात आल्यानंतर ठाणे शहरामध्ये अनेक ठिकाणी रस्त्यांवर टायर जाळून वाहतूक रोखण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी समर्थकांनी केला. मुंब्रा पोलीस स्थानकाबाहेर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ठिय्या आंदोलन करत असतानाच आता आव्हाडांच्या पत्नीने या प्रकरणावर पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे.

नक्की पाहा >> आव्हाडांविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल! पण मुख्यमंत्री शिंदेंच्या गाडीसमोर नेमकं घडलं तरी काय? Video आला समोर

सामाजिक कार्यकर्ता असलेल्या ऋता सामंत-आव्हाड यांनी तीन ट्वीट केले आहेत. पहिल्या ट्वीटमध्ये त्यांनी, “ज्या महिलेने ही तक्रार दाखल केली आहे, त्यांच्याकडे मोटीव्ह आहे. छट पुजेवरून झालेल्या बाचाबाचीत रिदा रशिद यांच्यावर अनेक गुन्हे दाखल असून त्या जामिनावर आहेत,” असं ऋता यांनी म्हटलं आहे. तसेच अन्य एका ट्वीटमध्ये, “राष्ट्रवादी व आव्हाडांविरोधात आक्षेपार्ह बोलल्या प्रकरणी हे गुन्हे रिदाविरोधात दाखल आहेत,” असंही ऋता यांनी सांगितलं.

नक्की पाहा >> जितेंद्र आव्हाडांविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल! ठाणे शहरात ठिकठिकाणी जाळपोळ; पाहा धक्कादायक Video

“अंगावर धडकणाऱ्या व्यक्तिला बाजूला करणे गुन्हा असेल तर बाजारात, ट्रेनमध्ये, रेल्वे पुलावर, गर्दीमध्ये रोज शेकड्यांनी ‘विनयभंग’ होत असतील,” असंही ऋता यांनी म्हटलं आहे. “रिदा रशिद या राजकारणी महत्वाकांक्षा बाळगतात.आणि काल रात्री त्या कुणाला तरी भेटल्या. त्यांच्यावर पण अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. जे काही घडलं ती स्पॉनटेनियस रिअॅक्शन होती. त्याला विनयभंग म्हणतां येत नाही,” असं आपल्या पतीची बाजू घेताना ऋता यांनी म्हटलं आहे.

नक्की वाचा: ‘हर हर महादेव’बद्दल नेमका आक्षेप काय? आव्हाड म्हणाले, “बाजीप्रभू छत्रपती शिवाजीमहाराजांशी लढायला गेले हे कुठे…”

रविवारी ठाणे आणि कळवा या दोन्ही शहरांना जोडणाऱ्या तिसऱ्या खाडी पुलाचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडला. या कार्यक्रमानंतर जितेंद्र आव्हाड हे मुख्यमंत्री शिंदेंच्या गाडीच्या बाजूने कार्यकर्त्यांच्या गर्दीमधून वाट काढून पुढे सरकत असतानाच रिदा रशीद हा त्यांच्या वाटेत आल्या. त्यावेळी आव्हाड यांनी रशीद यांच्या खांद्याजवळ पकडून बाजूला लोटल्याचं रिदा यांनी पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे.

नक्की वाचा >> “पुराव्यावाचून वाटेल तशी मूर्खपणाची…”, ‘हर हर महादेव’वरुन सेनेचा हल्लाबोल; ‘धर्मवीर’मध्येही तथ्यांची मोडतोड’ झाल्याचा आरोप

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘हर हर महादेव’ चित्रपटाच्या शो थांबवून प्रेक्षकांना मारहाण केल्याप्रकरणी राज्याचे माजी मंत्री आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांना अटक करुन रविवारी त्यांची जामीनावर सुटका करण्यात आली. मात्र आता ते या नव्या प्रकरणात अडकले असून या विषयावरुन आता ठाण्यातील राजकारण चांगलेच तापले आहे.