ठाणे – कल्याण रेल्वे यार्ड रिमॉडेलिंग प्रकल्पाच्या उभारणीचे काम प्रगतीपथावर आहे. कल्याण रेल्वे स्थानकाला नवा आयाम देणारा सुमारे ८१३ कोटींचा हा यार्ड रिमॉडेलिंग प्रकल्प सध्या जलद गतीने सुरू असून, या प्रकल्पाचा पहिला टप्पा येत्या ऑक्टोबर महिन्यात पूर्ण होणार आहे. तर येत्या दीड वर्षात उर्वरित काम देखील मार्गी लागणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

कल्याण रेल्वे स्थानकाबाहेरील वाहतूक कोंडीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. तर दिवसेंदिवस प्रवासी संख्या देखील वाढू लागल्याने रेल्वे स्थानक देखील अपुरे पडत आहे. कल्याण रेल्वे स्थानकातून दररोज बाराशेहून अधिक उपनगरी लोकल, सातशेहून अधिक मेल, एक्सप्रेस, मालवाहू गाड्या धावतात. यामुळे स्थानकातून दररोज तीन लाखांहून अधिक प्रवाशांची ये-जा असते. मात्र दिवसेंदिवस वाढत्या गर्दीमुळे अपुरे पडू लागले आहे. याच पार्श्वभूमीवर कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने रेल्वे प्रशासनाने कल्याण रेल्वे स्थानकाच्या विस्तारिकरणाचा प्रकल्प हाती घेतला आहे.

रेल्वेची कल्याण रेल्वे स्थानक परिसरात सुमारे शंभर हुन अधिक एकर जमीन आहे. या जमिनीच्या काही भागावर एक्सप्रेस विस्तारीकरणाचे यार्ड बांधले जात आहे. या यार्डमुळे बाहेरगावहून येणाऱ्या लांबपल्ल्याच्या गाड्या जुन्या कल्याण रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक पाच, सहा किंवा सातवर न येता त्या नवीन स्वतंत्र यार्डात जातील. मेल, एक्सप्रेस कल्याण रेल्वे स्थानकात उभी असेल तर अनेक वेळा लोकलना स्थानकाच्या बाहेर थांबा मिळत होता. नवीन यार्डमुळे तो थांबा रद्द होणार आहे. लोकलची धावसंख्या वाढेल.

कल्याण रेल्वे यार्ड रिमॉडेलिंग प्रकल्पाच्या उभारणीचे काम प्रगतीपथावर आहे. कल्याण रेल्वे स्थानकाला नवा आयाम देणारा सुमारे ८१३ कोटींचा हा यार्ड रिमॉडेलिंग प्रकल्प सध्या जलद गतीने सुरू असून, या प्रकल्पाचा पहिला टप्पा येत्या ऑक्टोबर महिन्यात पूर्ण होणार आहे. तर येत्या दीड वर्षात उर्वरित काम देखील मार्गी लागणार आहे.

कल्याण रेल्वे यार्ड रिमॉडेलिंग प्रकल्पांतर्गत सध्या कल्याण पूर्व भागात नवीन ट्रॅक टाकणे, फूटओव्हर ब्रिजवर कव्हरिंग शेड, डेकचे गर्डर आणि जुन्या गुड्स यार्ड ट्रॅक्स काढून नवीन टाकण्याची कामे सुरू आहेत. या प्रकल्पात गुड्स यार्डसाठी वेगळ्या रिसेप्शन आणि डिस्पॅच लाइन, तीन नवीन फूटओव्हर ब्रिज, फलाटांवर मोठ्या स्लॅबचे बांधकाम, एलिवेटेड डेक सेंटिस प्रकल्पाचाही समावेश आहे. हे काम येत्या दीड वर्षात पूर्णत्वास जाणार आहे.

प्रकल्पाचा फायदा काय ?

या प्रकल्पामुळे लांब पल्ल्याच्या आणि उपनगरीय गाड्यांच्या मार्गिका स्वतंत्र होऊन गाड्यांची गती आणि वेळेची अचूकता वाढेल. प्लॅटफॉर्मची संख्या वाढून प्रवाशांची गर्दी कमी होईल. रेल्वे फेऱ्यांची संख्या वाढवणे शक्य होईल. विमानतळाच्या धर्तीवर आधुनिक सुविधा मिळतील. बोगद्यातून होणारा पायी प्रवास बंद होईल. प्रवाशांना थेट होम प्लॅटफॉर्मपर्यंत वाहन घेऊन जाण्याची सुविधा मिळेल