डोंबिवली – चतुरंग प्रतिष्ठानच्या ५० व्या वर्धापनदिना निमित्त चैत्रपालवी संगीत महोत्सवाचे येत्या रविवारी येथे आयोजन केले आहे. संगीत क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नवोदित गुणवंतांना यावेळी सन्मानित केले जाणार आहे.

डोंबिवली पूर्वेतील टिळक रस्त्यावरील सुयोग मंगल कार्यालयात संध्याकाळी साडेचार वाजता कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे. चतुरंगच्या संगीत सन्मानासाठी प्रसिद्ध बासरी वादक पंडित नित्यानंद हळदीपूर यांची, संगीत शिष्यवृत्तीसाठी औरंगाबाद येथील युवा शास्त्रीय संगीत गायिका सावनी गोगटे यांची निवड करण्यात आली आहे.

हेही वाचा – ‘रेरा’ची मुदतवाढ ग्राहकांच्या मुळावर, ताबा लांबणीवर पडत असल्याने ग्राहकांच्या खिशाला कात्री

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चैत्रपालवी संगीतोत्सवाचे हे २९ वे वर्ष आहे. मागील सोळा वर्षांपासून हे दोन्ही सन्मान नवोदित वादक, गायक कलाकारांना दिले जातात. संगीततज्ज्ञ शुभदा पावगी, तबला वादक प्रवीण करकरे, तबला वादक पंडित चंद्रशेखर वझे यांची निवड समिती नवोदित कलाकारांची निवड करते. पत्रकार डाॅ. उदय निरगुडकर यांच्या हस्ते हे पुरस्कार वितरित केले जाणार आहेत. कार्यक्रमात प्राजक्ता काकतकर यांचे शास्त्रीय गायन, चिराग कट्टी यांच्या सितार वादनाची मैफल होणार आहे, असे चतुरंग प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्या नीलिमा भागवत यांनी सांगितले.