लोकसत्ता खास प्रतिनिधी

डोंबिवली- येथील पश्चिमेतील उमेशनगर भागातील पोलीस चौकीजवळ वर्दळीच्या रस्त्यावर भुयारी गटारावरील झाकण सततच्या वाहनांच्या वर्दळीमुळे तुटले आहे. रस्त्याच्या मध्यभागी तुटलेले हे झाकण चालकाच्या निदर्शनास आले नाहीतर अपघात होण्याची भीती पादचाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

उमेशनगर भागात भाजीपाला, मासळी बाजार आणि दैनंदिन बाजार याठिकाणी भरतो. रेतीबंदर मोठागाव, देवीचापाडा, राहुलनगर, महाराष्ट्रनगर, गरीबाचापाडा भागातील वाहने या रस्त्यावरुन वाहतूक करतात. उमेशनगर पोलीस चौकीसमोरील भुटारी गटारावरील झाकण मागील काही दिवसांपासून तुटले आहे. स्थानिक विक्रेत्यांनी या तुटलेल्या झाकणाच्या ठिकाणी झाडाच्या फांद्या, दगडी ठेऊन वाहन चालकांना इशारे देणाऱ्या खुणा लावल्या आहेत.

आणखी वाचा-घोडबंदर मार्गावर कंटेनर उलटला; दोन्ही मार्गावर वाहतूक कोंडी

रात्रीच्या वेळेत या खुणा निदर्शनास आल्या नाहीतर दुचाकी स्वार या तुटलेल्या झाकणाच्या भागात अडकून गंभीर जखमी होण्याची शक्यता आहे. मोटारीचे चाक या भुटारी गटारात अडकण्याची शक्यता विक्रेते व्यक्त करत आहेत. पहाटेच्या वेळेत अनेक विक्रेत्यांची या भागात वर्दळ असते. एखाद्याचा पाय या गटारात अडकून पादचारी जखमी होण्याची शक्यता आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पालिकेच्या ह प्रभागापासून हाकेच्या अंतरावर हे तुटलेले झाकण आहे. पालिका कामगार, बांधकाम अभियंते या रस्त्यावरुन येजा करतात. त्यांना हे तुटलेले झाकण दिसत नाही का, असे प्रश्न स्थानिक रहिवासी करत आहेत.