कल्याण- डोंबिवली पश्चिमेतील कुंभारखाणपाडा भागातील हरितपट्ट्यात उभारण्यात येत असलेल्या सर्व बेकायदा इमारती त्या भूभागाचे सर्व्हेक्षण करुन, योग्य ती कार्यवाही करुन जमीनदोस्त कराव्यात, असे आदेश कल्याण डोंबिवली पालिकेचे आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे यांनी साहाय्यक संचालक नगररचना, अतिक्रमण नियंत्रण विभागाला दिले आहेत.सागरी मंडळाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी हरितपट्टा भागाला भेट देऊन आपल्या हद्दीत ही बांधकामे उभी राहत आहेत का. या बांधकामांनी सागरी किनारा नियमन हद्द, पर्यावरण हक्क नियमांचे उल्लंघन बांधकाम करताना केले आहे का याची तपासणी केली. महसूल अधिकाऱ्यांनी कुंभारखाणपाडा हरितपट्टा भागाची पाहणी करुन एक अहवाल तहसीलदारांना पाठविला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>>पूर्व द्रुतगती महामार्गावरील कोंडीतून ठाणेकरांची आजपासून होणार सुटका, बहुप्रतिक्षित कोपरी रेल्वे पूलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज लोकार्पण

नगररचना विभागातील भूमापकांनी हरितपट्टा हद्दीची निश्चिती करावी. अतिक्रमण विभागाचे उपायुक्त, ह प्रभागाचे साहाय्यक आयुक्त यांनी हरितपट्टा चतुसिमेच्या आत उभी राहिेलेली सर्व बेकायदा इमारतींची बांधकामे योग्य ती कार्यवाही करुन पोलीस बंदोबस्तात जमीनदोस्त करावी, असे निर्देश आयुक्त डाॅ. दांगडे यांनी अतिक्रमण नियंत्रण अधिकाऱ्यांना दिले आहेत. डोंबिवली शहरातील एक मोठा हरितपट्टा भूमाफियांनी बांधकामे करुन हडप करण्यास सुरुवात केल्याने नागरिक, पर्यावरणप्रेमींनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.कुंभारखाणपाडा येथील हरितपट्ट्यातील सर्व्हे क्रमांक ७९ चा हिस्सा १६-१७ या चार हजार चौरस मीटर जागेवर १० बेकायदा इमारती उभारणीचे काम माफियांनी सुरू केले आहे. या इमारतींमध्ये एकूण २५० घरे असणार आहेत. एक घर १९ लाख ते २८ लाखापर्यंत विकले जात आहे. मुंबई परिसरातील चाळ, झोपडपट्टी भागातील रहिवाशांनी या या बेकायदा इमारतीमधील घरांसाठी आगाऊ रक्कम देऊन नोंदणी करुन ठेवली आहे. हे रहिवासी आता अडचणीत आले आहेत. पालिकेची नगररचना विभागाची बनावट बांधकाम मंजुरी, नोटरी पध्दतीने दस्तऐवज तयार करुन या बेकायदा इमारतींमधील घरे सामान्य नागरिकांना बांधकामे अधिकृत आहेत असे सांगून बनावट पध्दतीने विकली जात आहेत, असे एका घर खरेदीदाराने सांगितले.

हेही वाचा >>>कल्याणमध्ये रेल्वे सुरक्षा बळाच्या अधिकाऱ्याची हवालदाराकडून हत्या

६५ बेकायदा इमारत घोटाळ्यातील आरोपी मे. आदित्य इन्फ्राचे विकासक प्रफुल्ल गोरे, मे. निर्माण होम कन्सट्रक्शनचे मनोज सखाराम भोईर, त्यांचे भागीदार आदेश बिल्डर्सचे सिध्देश प्रदीप कीर, सिकंदर निळकंठ नंदयाल, कुलदीप रामकिसन चोप्रा या भूमाफियांनी ही बेकायदा इमारत उभारणीची कामे सुरू केली आहेत. मे. गोल्डन डायमेन्शन या इमारतीचा वास्तुविशारद आहे.हरितपट्ट्यात बेकायदा इमारती उभारण्याचे वृत्त ‘लोकसत्ता ठाणे’ सह दैनिकात प्रसिध्द होताच, अनेक घर खरेदीदार, गुंतवणुकदारांनी फसवणूक झाल्याने काळजी व्यक्त केली. पालिका आयुक्तांनी या वृत्ताची गंभीर दखल घेऊन अतिक्रमण नियंत्रण विभागाला हरितपट्ट्यातील बेकायदा इमारती जमीनदोस्त करण्याचे आदेश दिले आहेत, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. ही बांधकामे वाचविण्यासाठी भूमाफिया काही लोकप्रतिनिधींकडे गेले होते. एकाही लोकप्रतिनिधीने या माफियांना दारात उभे केले नसल्याचे समजते.

हेही वाचा >>>पूर्व द्रुतगती महामार्गावरील कोंडीतून ठाणेकरांची आजपासून होणार सुटका, बहुप्रतिक्षित कोपरी रेल्वे पूलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज लोकार्पण

पोलीस विभागानेही पर्यावरण संवर्धनाचा विचार करुन हरितपट्ट्यातील बेकायदा बांधकामे पाडण्यासाठी पालिकेला पूर्ण सहकार्य करण्याचा निर्णय घेतला असल्याचे एका विश्वसनीय पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.बेकायदा बांधकामांच्या तक्रारी करणारे तक्रारदार, माहिती कार्यकर्ते, वृत्त छापणाऱ्यांचा बदला घेण्याची भाषा आता माफियांकडून समुहाने केली जात आहे.

“कुंभारखाणपाडा हरितपट्टयातील सर्व बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. योग्य ती कार्यवाही, पोलीस बंदोबस्त मिळाल्यानंतर ही बांधकामे तोडण्याची कारवाई केली जाणार आहे.”-सुधाकर जगताप,उपायुक्त,अतिक्रमण नियंत्रण

(कुंभारखाणपाडा उल्हास खाडी किनारी हरितपट्ट्यात उभारण्यात येत असलेली १० बेकायदा इमारतींची बांधकामे.)

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Commissioner order to raze the illegal constructions in the green area of dombivali kumbharkhan pada amy
First published on: 09-02-2023 at 14:50 IST