डोंबिवली- येथील एका सेवानिवृत्ताची कल्याण मधील खडकपाडा भागात राहणाऱ्या दाम्पत्याने वाढीव व्याजाचे आमीष दाखवून ७७ लाख ७३ हजार रुपयांची फसवणूक केली आहे. पूजा विशांत भोईर (३३), पती विशांत भोईर (३५) अशी गुन्हा दाखल झालेल्या पती, पत्नीची नावे आहेत. डोंबिवलीतील शिवमंदिर भागात राहणारे शांताराम गणपत निलख (६०) यांची या दाम्पत्याने फसवणूक केली आहे.

हेही वाचा >>> कल्याण-डोंबिवलीत रस्त्यावरील धूळ नियंत्रणासाठी पालिकेकडून लवकरच दोन सयंत्र

पोलिसांनी सांगितले, शांताराम निलख हे सेवानिवृत्त आहेत. कल्याण मधील खडकपाडा भागात राहणाऱ्या पूजा आणि विशांत या पती, पत्नीने शांतराम यांचा विश्वास संपादन केला. त्यांना दर आठवड्याला ७७ लाख रुपयांच्या रकमेवर वाढीव व्याज देण्याचे आमीष दाखविले. दर आठवड्याला मोठी रक्कम हातात पडणार असल्याने शांताराम यांनी भोईर दाम्पत्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवला. गुंतवणुकीनंतर ठरल्याप्रमाणे भोईर दाम्पत्याने शांताराम यांना दर आठवड्याला ठराविक रक्कम देणे आवश्यक होते. ती रक्कम देण्यास ते टाळाटाळ करू लागले. सतत तगादा लावूनही आरोपी भोईर दाम्पत्य वाढीव व्याज नाहीच पण मूळ रक्कमही परत करत नसल्याने आपली फसवणूक त्यांनी केली असल्याची खात्री शांताराम यांची झाली. त्यांनी रामनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.