ठाणे : रोटरी इंडिया क्लब या संस्थेचे सॉफ्टवेअर हॅक करून सदस्यांची खासगी माहिती चोरी करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. संस्थेच्या एक लाख सदस्यांचा तपशील उपलब्ध असल्याचा दावा हॅकरने एका संदेशामध्ये केला असून, याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आदी क्षेत्रांतील नामवंत ‘रोटरी इंडिया क्लब’ संस्थेचे सदस्य आहेत. या संस्थेकडून देशभरात विविध कार्यक्रम राबवले जातात. त्यामुळे संस्थेचे जाळे देशभर पसरले आह़े  या सदस्यांची माहिती आणि त्यांचा इतर तपशील संरक्षित करण्याचे काम ठाण्यातील एका सॉफ्टवेअर कंपनीकडून केले जाते. हॅकरने हे सॉफ्टवेअर हॅक केले आहे.

या सॉफ्टवेअरमध्ये सदस्यांची खासगी माहिती होती. हॅकरने ही माहिती १९ हजार ९९९ रुपयांना विक्रीसाठी काढली असून, त्यासंदर्भातील ई-मेल आणि व्हॉट्सअ‍ॅप संदेश रोटरी क्लबच्या सदस्यांना प्राप्त झाले आहेत. संस्थेच्या एक लाखाहून अधिक सदस्यांचे मोबाइल क्रमांक, नाव, पत्ता, ई-मेल खाते, त्यांचे व्यवसाय, नोकरीचे ठिकाण, जन्मतारीख, विवाहाची तारीख असा तपशील विकत घेऊ शकता, असे हॅकरच्या या संदेशामध्ये म्हटले आहे.

या घटनेची माहिती संस्थेच्या सदस्यांना मिळाल्यानंतर त्यांनी स्वॉफ्टवेअर कंपनीच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला. या माहितीच्या चोरीप्रकरणी तसेच त्याचा गैरवापर होण्याची शक्यता असल्याने स्वॉफ्टवेअर कंपनीच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या तक्रारीच्या आधारे कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

‘रोटरी क्लब’च्या सदस्यांची माहिती हॅक झाली असून, गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या पथकाकडून त्याचा तपास सुरू आहे.

राकेश बाबशेट्टी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कासारवडवली पोलीस ठाणे</strong>

किती जणांना फटका?

देशात ‘रोटरी क्लब’चे सुमारे दीड लाख सदस्य आहेत़  त्यापैकी एक लाख सदस्यांची खासगी माहिती उपलब्ध असल्याचा दावा हॅकरने केल्याने खळबळ उडाली आह़े  मात्र, याबाबत तपास सुरू असून, नेमक्या किती जणांची खासगी माहिती चोरीला गेली, हे तपासांतीच स्पष्ट होईल़

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cyber hackers stolen personal information of rotary club members zws
First published on: 16-08-2022 at 02:34 IST