कल्याण रेल्वे स्थानकात धावत्या एक्सप्रेसमधून उतरणाऱ्या एका प्रवाशाचा फलाटावरून थेट रूळावर पडल्याने जागीच मृत्यू झाला. गुरुवारी दुपारी ही घटना घडली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दीप भंगाळे (४५) असे मृत प्रवाशाचे नाव आहे. ते गुरुवारी सकाळी भुसावळ येऊन कल्याण येथे एक्सप्रेसने येत होते. ते कल्याणला न थांबणाऱ्या एक्सप्रेसमध्ये बसले होते. कल्याण रेल्वे स्थानक आल्यावर एक्सप्रेस थांबेल, मग उतरू असे प्रदीप यांना वाटले. एक्सप्रेसला कल्याण स्थानकात थांबा नसल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी धावत्या लोकलमधून फलाटावर उडी मारली. त्यामुळे फलाटावरून घरंगळत रेल्वे रूळावर पडले. कल्याण लोहमार्ग पोलिसांनी त्यांचा मृतदेह ताब्यात घेतला.

प्रदीप हे कल्याण डोंबिवली पालिकेत यापूर्वी ठेकेदार म्हणून काम करायचे. प्रवाशांनी धावत्या एक्सप्रेस, लोकलमधून उतरू किंवा चढू नये, असे आवाहन लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाल्मिक शार्दुल यांनी केले आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Death of a passenger getting off the platform from a running express at kalyan railway station msr
First published on: 07-04-2022 at 21:31 IST