डोंबिवली – वारंवार वीज पुरवठा खंडित का होतो. लवकर वीज पुरवठा सुरू करा, असे प्रश्न करत डोंबिवली पश्चिमेतील कैलासनगर-शास्त्रीनगर भागातील दोन इसमांनी महावितरणच्या डोंबिवली विभागाच्या साहाय्यक अभियंत्याला मंगळवारी मध्यरात्री बेदम मारहाण करत, याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार केली तर जीवे ठार मारण्याची धमकी दिली आहे.

मुकेश पुंडलिक पाटील, रूपेश (पूर्ण नाव नाही) अशी मारहाण करणाऱ्या इसमांची नावे आहेत. महावितरणच्या जुनी डोंंबिवली शाखेचे साहाय्यक अभियंता जयेश बेंढारी यांना मारहाण झाली आहे. बेंढारी यांच्या तक्रारीवरून विष्णुनगर पोलिसांनी दोन्ही इसमांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी सांगितले, मंगळवारी मध्यरात्री कैलासनगर, शास्त्रीनगर भागाचा वीज पुरवठा तांत्रिक कारणामुळे बंद झाला होता. हा वीज पुरवठा सुरळीत करण्याचे काम मध्यरात्रीच्या वेळेस साहाय्यक अभियंता जयेश बेंढारी करत होते. टप्प्याने वीज पुरवठा पूर्ववत करत बेंढारी इंदिरानगर भागातून कैलासनगर चौकात आले. त्यावेळी आरोपी मुकेश पाटील, रूपेश यांनी साहाय्यक अभियंता बेंढारी यांना वीज पुरवठा बंद झाला आहे तरी तो पूर्ववत का करत नाहीत असे बोलत, घाणेरड्या शब्दात शिवीगाळ करत मारहाण सुरू केली.

News About Salman Khan
Salman Khan Threat : सलमान खानला धमकी देणाऱ्या तरुणाला ‘या’ राज्यातून करण्यात आली अटक, ५ कोटींची मागितली खंडणी
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
Bangladesh Power Supply Alert
Bangladesh Power Supply Alert : अदानी पॉवरचा बांगलादेशला वीज खंडित करण्याचा इशारा; मोहम्मद युनूस सरकार थकीत वीज बिल भरणार?
kalyan Dombivli municipal corporation
डोंबिवलीतील कोपरमध्ये स्थगिती आदेश देऊनही बेकायदा बांधकामाची उभारणी सुरूच; शासन, कडोंमपाचे आदेश बांधकामधारकांकडून दुर्लक्षित
senior citizen cheated, Varad Properties,
पुणे : गुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठ नागरिकाची दोन कोटींची फसवणूक, वरद प्राॅपर्टीजच्या संचालकांविरुद्ध गुन्हा
Discrepancy in teaching hours in RTE and State Syllabus
आरटीई, राज्य अभ्यासक्रम आराखड्यातील अध्यापन तासांमध्ये विसंगती… झाले काय, होणार काय?
Pimpri, Pimpri property under tax, Pimpri latest news,
पिंपरी : अडीच लाख मालमत्ता कर कक्षेत, ३०० कोटींचा महसूल वाढणार
st employees Diwali gift
एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, उचल नाही

हेही वाचा – डोंबिवली: आयरेतील बेकायदा साई रेसिडेन्सीवर हातोडा, उच्च न्यायालयाच्या आदेशावरून कारवाई

बेंढारी यांनी आपण वीज पुरवठा पूर्ववत करण्याचे काम करत आहोत. त्यामुळे आपल्या कामात अडथळा आणू नका असे सांगूनही मुकेश, रुपेश यांनी बेंढारी यांना मध्यरात्रीच्या वेळेत बेदम मारहाण केली. यावेळी बचावासाठी कोणीही नसल्याने बेंढारी यांची कोंडी झाली.

हेही वाचा – कल्याणमध्ये स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्याला पालिका आयुक्तांची नोटीस

या मारहाणीनंतर आपण आमच्या विरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार केली तर तुम्हाला जीवे ठार मारू अशी धमकी मुकेश पाटील, रूपेश यांनी अभियंता बेंढारी यांना दिली. या घटनेनंतर आरोपी पळून गेले. बेंढारी यांनी मध्यरात्रीच विष्णुनगर पोलीस ठाणे गाठले. आरोपींविरुद्ध तक्रार दाखल केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पवार यांनी याप्रकरणाचा तपास सुरू केला आहे.