कल्याण पूर्वेत रविवारी संध्याकाळी एक सेवानिवृत्त नागरिक मलंग रस्त्यावरील कॅनरा बँकेच्या एटीएम केंद्रात जाऊन जवळील डेबिट कार्डद्वारे पैसे काढत होते. यावेळी दोन भामटे पैसे काढण्याचे निमित्त करुन एटीएम केंद्रात गेले. त्यांनी सेवानिवृत्त नागरिकाला बोलण्यात गुंतवून त्यांच्या जवळील डेबिट कार्ड स्वताकडे घेऊन बंद एमटीएम कार्ड त्यांच्या हातात टेकवून पसार झाले.

हेही वाचा >>>VIDEO: ठाण्यात पोलिसांनी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना झोडपलं, पाहा व्हिडीओ

काही वेळ हा प्रकार सेवानिवृत्ताच्या निदर्शनास आला नाही. ते त्याच एटीएम केंद्रात दोन भामट्यांनी दिलेल्या कार्डच्या माध्यमातून पैसे काढत होते. हा प्रकार सुरू असताना सेवानिवृत्ताला आपल्या मोबाईलवर आपल्या महाराष्ट्र बँक खात्या मधून ४० हजार ४५० रुपये काढले आहेत असे लघुसंदेश आले. आपण पैसे काढले नसताना आपले पैसे काढले कोणी असा प्रश्न त्यांना पडला. जवळील डेबिट कार्डच्या साहाय्याने एटीएम केंद्रातून पैसे बाहेर येत नव्हते.

हेही वाचा >>>कल्याण: सम्राट अशोक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी घेतली व्यसन मुक्तीची शपथ

सेवानिवृत्त नागरिकाने जेव्हा आपल्या हातामधील कार्ड तपासले. तेव्हा त्यांना आपल्या हातात बंद असलेले वेगळ्याच बँकेचे एटीएम कार्ड असल्याच निदर्शनास आले. आपले महाराष्ट्र बँकेचे डेबिट कार्ड भामट्यांनी लबाडीने आपल्या हातामधून काढून घेऊन बाजुच्या एटीएम केंद्रात जाऊन पैसे काढले असल्याचे सेवानिवृत्ताच्या निदर्शनास आले.

हेही वाचा >>>Jitendra Awhad Court: गर्दीत विनयभंग कसा होऊ शकतो? जितेंद्र आव्हाडांच्या वकिलांचा प्रश्न, न्यायाधीशांना दाखवला व्हिडीओ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भास्कर पाटील (६३, रा. राय रेसिडेन्सी, तिसगाव, कल्याण पूर्व) असे फसवणूक झालेल्या नागरिकाचे नाव आहे. पाटील रविवारी संध्याकाळी पैसे काढण्यासाठी गेले. तेव्हा त्याच्या पाठोपाठ दोन इसम एटीएम केंद्रात शिरले. त्यांनी भास्कर पाटील यांना एटीएम केंद्रात यंत्राचे अमुक बटन दाबा, ते बटन दाबा असे गोंधळुन त्यांचा गुप्त संकेतांक समजून घेतला. भामट्यांनी स्वताजवळील बंद पडलेले एटीएम कार्ड पाटील यांच्या ताब्यात देऊन त्यांच्या कडील महाराष्ट्र बँकेचे एटीएम कार्ड स्वताकडे घेतले. बोलण्यात गुंतवणूक पाटील यांची फसवणूक करण्यात आली आहे. कोळसेवाडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.