scorecardresearch

Premium

ठाणे : दिवा स्थानकातून सीएसएमटी गाड्या सोडा, प्रवासी संघटनेची स्वाक्षरी मोहीम

दिवा रेल्वे स्थानकातून दिवा ते सीएसएमटी ही उपनगरीय रेल्वेगाडी सुरू व्हावी या मागणीसाठी बुधवारी दिवा रेल्वे स्थानकात स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली.

Release CSMT trains from Diva
ठाणे : दिवा स्थानकातून सीएसएमटी गाड्या सोडा, प्रवासी संघटनेची स्वाक्षरी मोहीम (संग्रहित छायाचित्र)

ठाणे : दिवा रेल्वे स्थानकातून दिवा ते सीएसएमटी ही उपनगरीय रेल्वेगाडी सुरू व्हावी या मागणीसाठी बुधवारी दिवा रेल्वे स्थानकात स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. दिवा रेल्वे स्थानकातून प्रवास करताना प्रवाशांना रेल्वेगाड्यांमध्ये प्रवेश करणे शक्य होत नाही. त्यामुळे मागील अनेक दिवसांपासून येथील नागरिक दिवा स्थानकातून रेल्वेगाडी सुरू करावी अशी मागणी करत आहेत. स्वाक्षरी मोहिमेस दिवेकरांकडून प्रतिसाद मिळत असल्याचे प्रवासी संघटनेचे म्हणणे आहे. स्वाक्षऱ्यांचे निवेदन रेल्वे प्रशासनाला देण्यात येणार आहे.

गेल्या काही वर्षांपासून दिवा शहरात मोठ्याप्रमाणात नागरिकरण वाढले आहे. त्यामुळे दिवा स्थानकातून प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. पूर्वी दिवा रेल्वे स्थानकात धिम्या रेल्वेगाड्यांची वाहतूक होत होती. प्रवाशांची संख्या वाढू लागल्याने येथे जलद रेल्वेगाड्या थांबण्यास सुरुवात झाली आहे. परंतु या रेल्वेगाड्या कर्जत, कसारा भागातून येणाऱ्या आहेत. त्यामुळे या रेल्वेगाड्या तेथूनच भरून येत असतात. या गाड्यांमध्ये प्रवाशांना प्रवेश मिळविणे शक्य होत नाही. त्यामुळे दिवा स्थानकातून जलद रेल्वेगाड्यांचा प्रवाशांना उपयोग नसल्याचे दिसून येत आहे. या त्रासाला कंटाळून काही दिवसांपूर्वी दोन महिलांनी गाडी अडवून आंदोलन केले होते. त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यानंतर दिव्यातील प्रवाशांकडून दिवा -सीएसएमटी रेल्वेगाडी सुरू करावी अशी मागणी जोर धरू लागली होती. दिव्यातील संघर्ष कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष विजय भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. या स्वाक्षऱ्यांची प्रत रेल्वे मंत्री, मध्य रेल्वे प्रशासन, जिल्हाधिकाऱ्यांना दिली जाणार आहे.

Thane Station, Passengers, Risk Lives, cutted Iron Barriers, Crossing railway Tracks, central railway,
ठाणे स्थानकात प्रवाशांचा जीवघेणा प्रवास, श्रम टाळण्याबरोबच वेळेच्या बचतीसाठी रेल्वे रुळ ओलांडत लोखंडी अडथळ्यांमधून प्रवास
Dombivli railway station staircase
डोंबिवली रेल्वे स्थानकातील जिना तोडल्याने प्रवाशांची फरफट
Planning of bus service from four stations in Nashik city
नाशिक : शहरातील चार स्थानकांतून बससेवेचे नियोजन
Aastha Express stone pelting Nandurbar railway station ayodhya surat ram mandir
आस्था एक्स्प्रेसवर नंदुरबारजवळ दगडफेक ?

हेही वाचा – भाईंदर : नव्या वर्सोवा पुलाची दुरुस्ती, पावसाळ्यात खड्डे पडल्याने आता नव्याने काम सुरू

हेही वाचा – मानपाडा, उंबर्डे येथील रस्ता रूंदीकरणाची कामे तातडीने मार्गी लावा, कडोंमपा आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांचे आदेश

दिवा स्थानकातून रेल्वेगाड्या सुटाव्या यासाठी होम फलाट उपलब्ध आहे. मोहिमेला प्रवाशांचा प्रतिसाद मिळाला. सुमारे १५ हजार प्रवाशांनी स्वाक्षऱ्या करून रेलवेविरुद्ध आपला रोष व्यक्त केला. या मोहिमेतूनही मार्ग निघाला नाही तर रेल्वे रुळांवर उतरू. – विजय भोईर, अध्यक्ष, संघर्ष कोकण रेल्वे प्रवासी संघटना.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Demand of release csmt trains from diva station a signature campaign of the passenger association ssb

First published on: 30-11-2023 at 17:46 IST

आजचा ई-पेपर : ठाणे

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×