लोकसत्ता खास प्रतिनिधी

डोंबिवली: कल्याण डोंबिवली पालिकेच्या डोंबिवलीतील कोपर येथील शास्त्रीनगर रुग्णालयात ताप, थंडी, खोकला या आजारांव्यतिरिक्त प्रसूती, अपघातामधील गंभीर जखमी यांच्यावर तात्काळ उपचार होत नसल्याने रुग्ण, त्यांच्या नातेवाईकांमध्ये तीव्र नाराजी आहे. दोन दिवसांपासून शास्त्रीनगर रुग्णालयात श्वान दंशावरील इंजेक्शन उपलब्ध नव्हती. त्यामुळे रुग्णाला बाहेरुन उपचार करुन घ्यावे लागले.

china people punished for not paying debt
जीवनावश्यक वस्तू खरेदी करणेही कठीण; कर्ज फेडू न शकणाऱ्यांना चीन कशी शिक्षा करत आहे?
yavatmal, Fire Breaks Out, Gynecology Department, Yavatmal government Medical College, No Casualties Reported, vasantrao naik government Medical College , fire in hospital, fire in yavatmal hospital,
यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील शस्त्रक्रिया गृहास आग, रूग्ण नसल्याने जीवितहानी टळली
World Parkinson's Day 2024 Parkinson's disease Symptoms and causes
World Parkinson’s Day 2024 : कंपवाताच्या १० टक्के रुग्णांमध्ये आनुवंशिक कारणाने आजार; डॉ. चंद्रशेखर मेश्राम म्हणतात…
ambulance caught fire in Yavatmal Fortunately four people including a pregnant woman survived
यवतमाळमध्ये धावती रुग्णवाहिका पेटली; गर्भवतीसह चार जण सुदैवाने बचावले

शास्त्रीनगर रुग्णालयाची भव्य वास्तू, पुरेसा कर्मचारी वर्ग असताना या ठिकाणी किरकोळ आजारांव्यतिरिक्त गंभीर, मोठ्या आजारांवर उपचार का केले जात नाहीत. पालिकेने आवश्यक तज्ज्ञ डाॅक्टर या ठिकाणी नियुक्त करावेत, अशी रुग्ण, नातेवाईकांची मागणी आहे. दिवसा-रात्री प्रसूतीसाठी महिला शास्त्रीनगर रुग्णालयात महिला आली की तिची प्राथमिक तपासणी करुन तिला उपस्थित डाॅक्टर खासगी रुग्णालय किंवा कळवा येथील छत्रपती शिवाजी रुग्णालय येथे पाठवितात, अशा नागरिकांच्या तक्रारी आहेत.

हेही वाचा…. डोंबिवली पूर्वेत नेहरु, फडके रस्त्यावर फेरीवाल्यांचे ठाण; मनसेच्या इशाऱ्याकडे फेरीवाल्यांचे दुर्लक्ष

गोरगरीब कुटुंब असेल तर त्यांची अशावेळी कुचंबणा होते. खासगी रुग्णालयातील खर्च वाढीव असल्याने अनेकांना तो खर्च परवडत नाही. बहुतांशी सामान्य कुटुंबातील रुग्ण शास्त्रीनगर रुग्णालयात येतात. याठिकाणी ताप, सर्दी, खोकला याव्यतिरिक्त गंभीर अपघातामधील जखमी, प्रसूती वेदना होत असलेली महिला, सिझरिनची शस्त्रक्रिया या रुग्णांवर उपचार होत नाहीत. रुग्ण, नातेवाईक रुग्णालयातील आरोग्य सेवेविषयी नाराजी व्यक्त करतात.

हेही वाचा…. वाड्याजवळ कंटेनर व बसमध्ये अपघात, २० प्रवाशांसह कंटेनर चालक जखमी

श्वान दंश इंजेक्शन तुटवडा

मंगळवारी दुपारी वंशिता पाटील या मुलीला कुत्रा चावल्याने ती श्वान दंशावरील इंजेक्शन घेण्यासाठी शास्त्रीनगर रुग्णालयात आली होती. तेथे इंजेक्शनचा तुटवडा होता. कुत्रा चावल्याची जखम गंभीर असल्याने तिच्यावर तातडीने उपचार होणे आवश्यक होते. अखेर तिच्या कुटुंबीयांनी बाहेरुन ४०० रुपयांचे इंजेक्शन खरेदी केले. ते पालिका रुग्णालयातून घेण्यात आले. शहरात दररोज तीन ते चार श्वान चावल्याच्या घटना घडतात. पालिकेने रुग्णालयात या इंजेक्शनचा पुरेसा साठा करुन ठेवणे आवश्यक आहे, अशी मागणी कुटुंबीयांकडून करण्यात आली. कुत्रा चावल्याचा प्रत्येक रुग्णाला बाहेरील महागडे इंजेक्शन परवडणारे नसते. प्रत्येकाचा ओढा पालिका रुग्णालयाकडे असतो, असे रुग्ण नातेवाईकांनी सांगितले.

साठ्याची आवक

पुरवठादाराकडून साठा येण्यास उशीर झाला. त्यामुळे शास्त्रीनगर रुग्णालयात रेबिजच्या इंजेक्शनचा तुटवडा होता. ही इंजेक्शन तातडीने मागवून घेण्यात आली. या इंजेक्शनचे दोन प्रकार आहेत. एक साधी जखम आणि एक रक्तस्त्राव होत असलेली जखम. श्वान चावल्याची जखम अधिक असेल तर त्यावर प्रभावी प्रतिजैविके तयार करणारे इंजेक्शन दिले जाते. आता रेबिज इंजेक्शनचा पुरेसा साठा आहे, असे औषध पुरवठा विभागातून सांगण्यात आले.

“ पुरवठादाराकडून औषध साठा येण्यास उशीर झाला तरच रेबिज इंजेक्शनची तूट जाणवते. ही इंजेक्शन तात्काळ शास्त्रीनगर रुग्णालयात उपलब्ध होतील यासाठी आदेश देते. प्रसूती झाल्यानंतर अनेक महिलांना वेदना, बाळाची नाजूक परिस्थिती, गुंतागुंतीची परिस्थिती असेल तर रुग्ण महिला, नातेवाईकांची धावपळ नको म्हणून अगोदरच त्यांना योग्य सल्ला दिला जातो. आपण काही नवीन सुविधा रुग्णालयात देत आहोत.” – डाॅ. अश्विनी पाटील, वैद्यकीय आरोग्य अधिकारी