रिक्षा वाहनतळांवरील चालकांकडून संघटनेच्या नावे नियमित सदस्य शुल्क आकारणाऱ्या रिक्षा संघटनेच्या एका वसुली सेवकावर दोन जणांनी चाकू हल्ला केला. या हल्ल्यात वसुली सेवक जखमी झाला आहे.

विकास गौतम कोळी (३४, रा. रिक्षा संघटनेत वसुली सेवक), लक्ष्मी सोसायटी, गोळवली, डोंबिवली पूर्व) असे जखमी वसुली सेवकाचे नाव आहे. गणेश जनार्दन आहेर (३६), दिनेश जनार्दन आहेर (३४, रा. क्रांतिनगर झोपडपट्टी, रोहिदासनगर, टंडन रस्ता, डोंबिवली पूर्व) अशी आरोपींची नावे आहेत.
डोंबिवली पूर्वेतील केळकर रस्त्यावरील गुरूदेव हाॅटेल येथे वसुली सेवक विकास कोळी यांना गणेश, दिनेश आहेर या दोन बंधूंनी रात्री ११ वाजता गाठले. पूर्ववैमनस्यातून दोघांनी एकट्या असलेल्या विकास कोळी यांना शिवीगाळ, धक्काबुक्की करून मारण्याची धमकी दिली. यावेळी गणेशने स्वत:जवळील चाकू बाहेर काढून विकास कोळी यांच्या हातावर वार केला. विकास यांनी वार चुकविल्याने चाकूचा वार अंगठ्यावर बसला. विकासच्या अंगठ्याला गंभीर दुखापत झाली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डोंबिवली पूर्व, पश्चिमेतील रिक्षा वाहनतळांवर प्रामाणिकपणे व्यवसाय करणाऱ्या रिक्षा चालकांकडून रिक्षा संघटनांचे पदाधिकारी दररोज ठरावीक शुल्क आपल्या सेवकांमार्फत वसूल करतात. आम्ही दिवसभऱ् राबायचे आणि संघटनेने दररोज वसुली करायची याविषयी प्रामाणिकपणे व्यवसाय करणाऱ्या रिक्षा चालकांमध्ये तीव्र नाराजी आहे