डोंबिवली : डोंबिवली ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस धावणाऱ्या सकाळच्या वेळेतील लोकलमध्ये पुरूष फेरीवाले महिला डब्यांमधून वस्तू विक्री करत फिरतात. एकावेळी दोन ते तीन फेरीवाले महिला डब्यात गर्दीच्या वेळेत येतात. या फेरीवाल्यांना डब्यातून उतरण्याची सूचना केली तर ते उलटसुलट उत्तरे देतात, अशा तक्रारी डोंबिवलीतील महिला प्रवाशांनी केल्या.

सकाळच्या वेळेत डोंबिवली रेल्वे स्थानकातून सुटणारी लोकल प्रवाशांनी खचाखच भरलेली असते. डब्यात पाय ठेवायला जागा नसते. अशाप्रसंगी पुरूष फेरीवाले महिला डब्यात चढून ठाण्या पर्यंत जवळील वस्तुंची विक्री करतात. काही जण हेतुपुरस्कर घाटकोपर पर्यंत प्रवास करतात. अनेक महिला प्रवासी या फेरीवाल्यांना सकाळच्या गर्दीच्या वेळेत डब्यात कशासाठी येतात. असे प्रश्न करतात. त्यावेळी हे फेरीवाले वस्तू विक्री आमचा व्यवसाय आहे. आम्ही पण तिकीट काढून व्यवसाय करतो, अशी उलट उत्तरे महिला प्रवाशांना देतात.

Pune, firing, Firing on youth,
पुणे : शहरात गोळीबारची तिसरी घटना, काडीपेटी न दिल्याने तरुणावर गोळीबार
Stone Pelting in West Bengal
Ram Navami : पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार, मिरवणुकीत दगडफेक; पोलिसांकडून अश्रूधुराच्या नळकांड्यांचा वापर!
Chandrapur may Face Water Crisis as water level of Dams decreasing
चंद्रपूर : जलाशय व धरणे कोरडे पडण्याच्या मार्गांवर
IPL 2024 Lucknow Mumbai Indians vs Rajasthan Royal Match Updates in Marathi
IPL 2024 MI vs RR: हार्दिक पंड्याची हुर्यो उडवणाऱ्यांना रोहित शर्माने थांबवलं? व्हीडिओ होतोय व्हायरल

हेही वाचा : ठाणे खाडीतील बोटीमध्ये स्फोटकं आढळल्याने खळबळ; १६ जिलेटीन कांड्या आणि १७ डिटोनेटरचा साठा जप्त

सकाळ, संध्याकाळच्या वेळेत फलाटांवर रेल्वे डब्यांजवळ लोहमार्ग, रेल्वे सुरक्षा बळाचे जवान तैनात राहतील, याची काळजी घेण्यात यावी, अशी मागणी मागील काही महिन्यांपासून उपनगरी महिला रेल्वे प्रवासी महासंघाच्या अध्यक्षा लता अरगडे यांनी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली आहे. अधिकारी वर्ग त्याची दखल घेत नसल्याचे अध्यक्षा अरगडे यांनी सांगितले. महिला डब्यात चढणाऱ्या फेरीवाल्यांच्या पाठीवर वस्तुंची पिशवी, हातात दोन पिशव्या घेऊन गर्दीत हे फेरीवाले शिरतात. अगोदरच लोकल डब्यात महिला प्रवाशांची गर्दी असते. त्यात हे फेरीवाले वस्तू विक्रीसाठी डब्यात फिरतात. त्यामुळे महिलांना या फेरीवाल्यांना वाट करुन देण्यासाठी दररोज त्रास सहन करावा लागतो.

हेही वाचा : “…म्हणून एकत्र निवडणुकांचा घाट”, माजी मंत्री अनंत गीते यांचा गंभीर आरोप, म्हणाले…

रेल्वे स्थानकात रेल्वे सुरक्षा बळाचे जवान गस्तीवर असतात. पण ते मोबाईल मधील मनोरंजनाचे खेळ खेळण्यात व्यस्त असतात. त्यामुळे त्यांना महिला डब्यात कोणी फेरीवाला जात आहे हे त्यांच्या व्यस्ततेमुळे दिसत नाही, अशा तक्रारी महिला प्रवाशांनी केल्या. अलीकडे डोंबिवली रेल्वे स्थानकात गर्दुल्ले, मद्यपी, भिकारी यांचे प्रमाण वाढले आहे. स्कायवाॅकवर, जिन्यावर हे लोक पडलेले असतात. त्यांचाही त्रास प्रवाशांना सहन करावा लागतो. यापूर्वीसारखे रेल्वे सुरक्षा बळाचे जवान डोंबिवली रेल्वे स्थानकात तैनात राहत नसल्याने त्याचा गैरफायदा फेरीवाले, फिरस्ते, भिकारी, गरदुल्ले घेत असल्याच्या तक्रारी आहेत.

हेही वाचा : वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशासाठी खंडणीची मागणी; काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षासह पाचजणांविरोधात गुन्हा

“ लोकलच्या महिला डब्यात फेरीवाल्यांना प्रतिबंध असावा. काही फेरीवाले हेतुपुरस्सर सकाळच्या वेळेत गर्दीचा गैरफायदा महिला डब्यात येऊन विक्री व्यवसाय करतात. याचा त्रास महिला प्रवाशांना होतो. हा विषय अनेक वेळा रेल्वे अधिकाऱ्यांच्या बैठकीत उपस्थित केला आहे. तरीही महिला डब्यातील फेरीवाल्यांचे येणे कमी होत नाही. स्थानिक रेल्वे सुरक्षा बळाचे जवान गस्तीमध्ये कमी पडतात. वरिष्ठ त्याकडे दुर्लक्ष करतात. त्याचा हा परिणाम आहे.”, असे उपनगरी महिला रेल्वे प्रवासी महासंघाच्या अध्यक्षा लता अरगडे यांनी म्हटले आहे.