डोंबिवली: डोंबिवली जवळील गोळवली गावात एमआयडीसीतील एका कंपनीत काम करणाऱ्या काम करणाऱ्या कामगाराचे लिंग त्याच्याच साथीदारांनी मंगळवारी रात्री कापून कामगाराला जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. रात्रीच्या वेळेत मद्यपान केल्यानंतर हा प्रकार घडला, असे मानपाडा पोलिसांनी सांगितले. गंभीर जखमी कामगारावर मुंबईतील जे. जे. रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संजयकुमार मुन्सीराम राम (३१, रा. शंकर शेठ चाळ, गोळवली, डोंबिवली) असे जखमी कामगाराचे नाव आहे. सुरेंद्र कुमार रमेश राम, करणराम आश्रय राम, सोनुकुमार सियाराम राम (रा. शंकरशेठ चाळ, गोळवली ) अशी आरोपींची नावे आहेत. संजयकुमार संजयकुमार, आरोपी सुरेंद्रकुमार डोंबिवली एमआयडीसीतील जिमेन्सिटक कंपनीत कामाला आहेत. तक्रारदार संजयकुमार, सर्व आरोपी अनेक महिन्यांपासून गोळवलीतील शंकर शेठ चाळीत एकत्र राहतात. तक्रारदार संजयकुमार आणि आरोपींनी मंगळवारी रात्री राहत्या घरात मेजवानी करण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचा >>> ठाणे पालिकेतील अधिकारी आणि ठेकेदार चौकशीच्या फेऱ्यात सापडण्याची शक्यता

मासळी, गावठी दारु आणण्यात आली. सगळ्यांनी मिळून जेवण तयार केले. एकत्रित दारू प्यायली. सोनुकुमारने तक्रारदार संजयकुमारला सिगारेट आणण्यास सांगितले. ती ते बाजुच्या टपरीवरुन घेऊन आला. संजयकुमार घराबाहेर गेल्यानंतर आरोपींनी त्याला मारण्याचा कट रचला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांना आहे. रात्री १२ वाजेपर्यंत मेजवानी आटोपल्यावर सर्व जण झोपी गेले. रात्री एक वाजता सोनुकुमारने संजयकुमार याच्या सोबत जुन्या कौटुंबिक भांडणाचा राग मनात ठेऊन भांडण सुरू केले.

हेही वाचा >>> ठाणे जिल्ह्यातील १६ अनाथ चिमुकल्यांना मिळाले पालक

भांडण वाढत गेल्यानंतर सर्व आरोपींनी तक्रारदार संजयकुमार याला घट्ट पकडून ठेवले आणि सोनुकुमारने धारदार शस्त्राने संजयकुमारचे लिंग कापले. खूप रक्तस्त्राव सुरू झाल्याने आरोपींनी एकत्रितपणे संजयकुमारला शिवम रुग्णालयात नेले. तेथे प्राथमिक उपचार करुन त्याला जे. जे. रुग्णालयात नेण्यात आले, असे पोलिसांनी सांगितले. संजयकुमार रामच्या तक्रारीवरुन पोलिसांनी मानपाडा पोलीस आरोपींविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dombivli worker gender was amputated family dispute police crime news ysh
First published on: 11-01-2023 at 13:06 IST