लोकसत्ता प्रतिनिधी

ठाणे : भाजपाचे आमदार गणपत गायकवाड यांनी हील लाईन पोलीस ठाण्यात शिवसेनेचे पदाधिकारी महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता. याप्रकरणी आज, त्यांच्या पोलीस कोठडीची मुदत संपणार आहे. त्यामुळे त्यांना उल्हासनगर न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ठाणे पोलिसांनी त्यांना सकाळी ६:३० वाजताच्या सुमारास कळवा पोलीस ठाण्यातून फौजफाट्यासह उल्हासनगर येथील न्यायालयात नेले.

भाजपाचे आमदार गणपत गायकवाड यांनी हील लाईन पोलीस ठाण्यात शिवसेनेचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता. या प्रकरणानंतर संपूर्ण राज्यभरात खळबळ उडाली होती. गणपत गायकवाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना या प्रकरणात अटक झाली आहे. तर त्यांच्या मुलाचा पोलीस शोध घेत आहेत. अटकेनंतर गायकवाड यांना न्यायालयाने १४ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून त्यांना उल्हासनगर येथे न ठेवता ठाणे शहारा लगतच्या कळवा येथील पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे.

आणखी वाचा-फेरीवाल्यांविरोधात गुन्हे दाखल होण्यास सुरूवात, महिन्याभरात ४ हजारहून अधिकजणांविरोधात गुन्हे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आज त्यांची पोलीस कोठडी संपणार असल्याने त्यांना पुन्हा सकाळी ११ वाजेनंतर न्यायालयात हजर केले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर कळवा पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी ६:३० वाजताच्या सुमारास गणपत गायकवाड यांना उल्हासनगर न्यायालयात नेण्याची प्रक्रिया सुरू केली. त्यांनतर गायकवाड यांना न्यायालयात नेण्यात आले आहे. थोड्याच वेळात त्यांना न्यायाधीशासमोर हजर केले जाणार आहे. ठाणे पोलीस पुन्हा त्यांच्या कोठडीची मागणी करू शकतात.