scorecardresearch

Premium

ठाण्यात ईदची मिरवणूक गणेश विसर्जन मिरवणुकीच्या दुसऱ्या दिवशी

यंदा अनंत चतुर्दशी आणि ईद-ए-मिलाद हे सण २८ सप्टेंबर या एकाच दिवशी येत असून ठाणे शहरातील मुस्लिम समाजाने ईदची मिरवणूक गणेश विसर्जन मिरवणुकीच्या दुसऱ्या दिवशी काढण्याचा निर्णय घेतला.

Eid procession in Thane
ठाण्यात ईदची मिरवणूक गणेश विसर्जन मिरवणुकीच्या दुसऱ्या दिवशी (image – pixabay)

ठाणे : यंदा अनंत चतुर्दशी आणि ईद-ए-मिलाद हे सण २८ सप्टेंबर या एकाच दिवशी येत असून ठाणे शहरातील मुस्लिम समाजाने ईदची मिरवणूक गणेश विसर्जन मिरवणुकीच्या दुसऱ्या दिवशी काढण्याचा निर्णय घेतला. मुस्लिम समाजाने दाखविलेल्या सामाजिक आणि धार्मिक सोहार्द यामु‌ळे ठाणे पोलिसांवरील बंदोबस्ताचा काहीसा ताण कमी झाला आहे.

यंदा अनंत चतुर्दशी आणि ईद-ए-मिलाद हे सण २८ सप्टेंबर या एकाच दिवशी येत आहेत. अनंत चतुर्दशीच्या दिवशी शहरात गणेश मूर्ती विसर्जन मिरवणुका निघतात. तर, ईद-ए-मिलादच्या दिवशी शहरात जुलूस निघतो. हिंदू आणि मुस्लिम समाजाचे सण एकाच दिवशी असेल तर सर्वाधिक ताण पोलिसांवर असतो. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याची जबाबदारी पोलिसांवर असते. यामुळे अनंत चतुर्दशी आणि ईद-ए-मिलाद हे सण एकाच दिवशी आल्याने पोलिसांपुढे शहरात बंदोबस्त तैनात करण्याबरोबरच कायदा व सुव्यवस्था राखण्याचे मोठे आव्हान उभे राहील होते. या पार्श्वभूमीवर मुंबई तसेच इतर शहरांमध्ये २९ तारखेला ईदची मिरवणूक गणेश विसर्जन मिरवणुकीच्या दुसऱ्या दिवशी काढण्याचा निर्णय मुस्लिम समाजाने घेतला आहे. अशाचप्रकारचा निर्णय ठाण्यातील मुस्लिम समाजाने घेतला आहे.

man attempt to kill wife by giving poison in sangli
सांगली: नांदण्यास येत नाही म्हणून तरुणीला विषारी औषध पाजून मारण्याचा प्रयत्न
Lalbaugcha Raja Visarjan 2023
Lalbaugcha Raja Visarjan 2023 : लालबागच्या राजाचं अखेर २३ तासांनी विसर्जन, अत्याधुनिक तराफ्यातून बाप्पाला निरोप; पाहा VIDEO
government job office
शासकीय कार्यालयांना सलग पाच दिवस सुट्टय़ा
ram mandir
ठरलं! भगवान रामाच्या प्राणप्रतिष्ठा दिनी जंगी कार्यक्रम, भारतात जानेवारी महिन्यातही साजरी होणार दिवाळी

हेही वाचा – ठाणेकरांची घराजवळच गणेश मुर्ती विसर्जनास पसंती, दीड दिवसांच्या १३,९५५ गणेश मूर्तींचे विसर्जन, कृत्रिम तलाव व विशेष टाकीला प्राधान्य

हेही वाचा – गणेशोत्सवाच्या देखाव्यातून विविध सामाजिक संदेश; घरोघरी गणेशोत्सवासाठी चांद्रयान मोहिमेची आरास

ठाण्यातील राबोडी येथे सुन्नी सर्कल मशीद कमिटीची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीला समितीचे पदाधिकारी, धर्मगुरू आणि माजी नगरसेवक नजीब मुल्ला यांच्यासह इतर नागरिक उपस्थित होते. या बैठकीत दोन्ही समाजाला आपले सण आनंदात साजरे करता यावेत आणि पोलिसांवरही बंदोबस्ताचा ताण असू नये यासाठी ईदची मिरवणूक गणेश विसर्जन मिरवणुकीच्या दुसऱ्या दिवशी काढण्याचा निर्णय घेण्यात आला.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Eid procession in thane on the second day of ganesh visarjan procession ssb

First published on: 21-09-2023 at 18:06 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×