कल्याण – कल्याण, डोंबिवली, टिटवाळा, २७ गाव परिसरातील नागरिकांना आपल्या घर परिसरात मालमत्ता कर, पाणी देयक शुल्क भरण्याची सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून कल्याण डोंबिवली पालिकेच्या मालमत्ता कर विभागाच्या उपायुक्त कांचन गायकवाड यांनी वरिष्ठांच्या सूचनेप्रमाणे पालिका हद्दीत एकूण विशेष नवीन मालमत्ता कर आणि पाणी देयक भरणा केंद्रे सुरू केली आहेत. सकाळी १० ते पाच या कार्यालयीन वेळेत ही सुविधा केंद्रे सुरू राहणार आहेत.
पालिकेच्या दहा प्रभाग क्षेत्र स्तरावरील नागरी सुविधा केंद्र वगळून ही वाढीव नवीन भरणा केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. या सुविधेमुळे नागरिकांना कर भरणा, पाणी देयक भरणा करण्यासाठी पालिकेच्या नागरी सुविधा केंद्रात जाण्याची गरज लागणार नाही. अधिकाधिक कर भरणा वसुली व्हावी, पाणी देयकाची वसुली विहित वेळेत व्हावी या उद्देशाने प्रशासनाने हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
ज्या नागरिकांना आपल्या घराची मालमत्ता कर, पाणी देयक शुल्काची देयके मिळाली नसतील त्यांना या विशेष केंद्रांवर देयके उपलब्ध करून देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही ऑनलाईन देयके पाहूनही करदात्याचे देयक भरणा करून घेतले जाणार आहे, असे उपायुक्त कल्पना गायकवाड यांनी सांगितले.
विशेष देयक भरणा केंद्रे
अ प्रभाग क्षेत्र – मोहने पूर्व यादवनगर, शांताराम प्राईड सोसायटी, अटाळी विराट चौक, अटाळी कोळीवाडा, ब प्रभाग क्षेत्र – कल्याण पश्चिम उंबर्डे डी. बी. चौक, मोहन रिजन्सी, बारावे मुंबई विद्यापीठ उपकेंद्रासमोर, वसंत व्हॅली, क प्रभाग क्षेत्र – पत्रीपुलाजवळ सर्वोदय पार्क, जे प्रभाग क्षेत्र – नेतिवली, मेट्रो माॅलमागे, मेट्रो माॅल रेसिडेन्सी, लोकग्राम, आत्मारामनगर, निलगिरी सोसायटी, ड प्रभाग क्षेत्र – खडेगोळवली विठ्ठल रुक्मिणी मंदिर, कल्याण पूर्व. काटेमानिवली, विश्वास विद्यालयाजवळ, जुगनू जाधव कार्यालय, फ प्रभाग क्षेत्र – डोंंबिवली पूर्व ठाकुर्ली ९० फुटी रस्ता बालाजी आंगण सोसायटी, आगरकर रस्ता रघुनाथ जानकी सोसायटी, ह प्रभाग क्षेत्र – डोंबिवली पश्चिम घनश्याम गुप्ते रस्त्यावर शिधावाटप दुकानासमोर, स्वामी नारायण सिटी, मोठागाव, माणकोली पुलाजवळ, ग प्रभाग क्षेत्र – डोंबिवली पूर्व झायका हाॅटेलजवळ, पॅसिफिक औरा इमारत, आय प्रभाग क्षेत्र – कल्याण पूर्व क्लब हाऊस, अनमोल गार्डन काॅम्पलेक्स, ई प्रभाग क्षेत्र – डोंबिवली कल्याण शीळ रस्ता कासा रिओ, पलावा सिटी क्लब हाऊस, कासा बेला, क्लब हाऊस, काला बेला गोल्ड क्लब हाऊस.