दिवसेंदिवस घटत चाललेली भूजल पातळी, उन्हाळ्यात जाणवणारी पाणी टंचाई हा विचार करुन कल्याण मधील वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी कार्यालय आवारातील कुपनलिकेच्या माध्यमातून पर्जन्य जल संचयन प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला. या प्रकल्पाच्या माध्यमातून दरवर्षी सुमारे तीन लाख ७० हजार लीटर पाणी साठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पाण्याच्या बाबतीत आता प्रत्येक व्यवस्थेने जल पुनर्भरण प्रकल्प राबवून स्वयंपूर्ण होण्याची गरज आहे. या उद्देशातून हा प्रकल्प राबविण्यात आला, अशी माहिती कल्याण वन विभागाचे विभागीय वन अधिकारी संजय चन्ने यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे जिल्ह्यात अनेक धरणे आहेत. घरोघऱी कुपनलिका, सार्वजनिक विहिरी असुनही शहरी, ग्रामीण भागात अलीकडे डिसेंबर नंतर पाणी टंचाईला सुरुवात होते. पाऊस पडेपर्यंत जून अखेरपर्यंत नागरिकांना पाऊस पडे पर्यंत पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. टँकर आल्या शिवाय ग्रामीण, आदिवासी भागात नागरिकांना पाणी पिण्यास , घरगुती वापरास पाणी मिळत नाही. पाण्याची ही टंचाई ओळखून प्रत्येकाने आता पाणी वापर, संवर्धना संदर्भात जागरुक झाले पाहिजे. यासाठी प्रत्येकाने काही प्रकल्प राबविले पाहिजेत, हा विचार करुन कल्याण वन विभागाचे विभागीय वन अधिकारी चन्ने यांनी कल्याण यांनी आपल्या वन विभागाच्या कार्यालय आवारात पर्जन्य जल संचय प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचा : कल्याण डोंबिवली पालिका फक्त ‘सेटींगमध्ये स्मार्ट, मग टक्केवारी असो की नवीन पुरस्कार’ ; मनसे आमदार प्रमोद पाटील यांची टीका

हा प्रकल्प उभारणीसाठी वास्तुशिल्पकार आणि जलतज्ञ अरुण सपकाळे यांचे मार्गदर्शन घेण्यात आले. जल पुनर्भरणाचा सविस्तर आराखडा आणि आखणी वास्तुशिल्पकार सपकाळे यांनी वन विभागाला करुन दिला. वन विभागाच्या आवारातील कुपनलिकाच्या माध्यमातून हे जलपुनर्भरण करण्याची आखणी करण्यात आली. वन विभागाच्या कार्यालयाचे आवार क्षेत्र १८५ चौरस मीटर आहे. या शिवाय पावसाळ्यात छतावरुन पडणारे पाणी. याचे नियोजन करण्यात आले. ठाणे जिल्ह्यात सरासरी २५०० मिलीमिटर पाऊस पडतो. कल्याण तालुक्यात एवढेच प्रमाण पावसाचे आहे. कुपनलिकेच्या चारही बाजुने सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली जल पुनर्भरणासाठी अत्यावश्यक मांडणी करण्यात आली. एक महिनाभरात हा प्रकल्प पूर्ण करण्यात आला. वास्तुशिल्पकार सपकाळे यांच्या नियोजनप्रमाणे दरवर्षी वन विभागाकडून जलपुनर्भरणाव्दारे सुमारे तीन लाख ७० हजार लीटर पाणी जमिनीत साठविले जाणार आहे. यामुळे भूजल पातळी वाढण्यास मदत होणार आहे.

येत्या काळात वन विभाग कार्यालयाला बाहेरच्या पाण्यावर अवलंबून राहण्याची गरज लागणार नाही अशा पध्दतीने हे पाणी नियोजन करण्यात आले आहे. पावसाळ्यात कार्यालय परिसरात पडणारे पावसाचे पाणी कुपनलिकेत जाईल अशी व्यवस्था करण्यात आली आहे. अशाच पध्दतीने छतावरील पाण्याची व्यवस्था आहे. हा पथदर्शी प्रकल्प यशस्वी झाल्याने विभागीय वन अधिकारी चन्ने यांनी समाधान व्यक्त केले आहे. अशाप्रकारे प्रत्येक आस्थापना, व्यवस्थेने अशाप्रकारचे जल संचयन प्रकल्प राबवून पाणी संवर्धनासाठी पुढाकार घेतला पाहिजे तर येणाऱ्या काळात आपण पाणीटंचाईवर आपण मात करू शकू, असे चन्ने यांनी सांगितले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Every year 3 lakah storage of water rain harvesting project office premises forest department in kalyan tmb 01
First published on: 13-09-2022 at 12:39 IST