डोंबिवली एमआयडीसीतील मिलापनगर मधील मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर रविवारी संध्याकाळी उच्च दाब वीज वाहिनीचा स्फोट होऊन तार जमिनीवर पडली. या स्फोटाच्या आवाजमुळे रहिवासी घाबरले. स्फोटाच्या दणक्याने एका बंगल्यातील विद्युत यंत्रणा जळून खाक झाली आहे. स्फोटानंतर मिलापनगर मधील काही भागाचा विद्युत पुरवठा बंद झाला होता. ही माहिती मिळताच महावितरणचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मुख्य वीज पुरवठा बंद करुन तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेतले. त्यानंतर दीड तासाने वीज पुरवठा पूर्ववत झाला.

हेही वाचा >>> डोंबिवलीतील आनंदप्रेम पतसंस्थेच्या तिजोरीतील सोन्यावर लिपीकाचा डल्ला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मिलापनगर मधील आरएल १०४ आणि आरएल १०५ बंगल्यांना स्फोटाची सर्वाधिक झळ बसली. डाॅ. मंजुषा पवार यांच्या घरातील टीव्ही, फ्रिज, वीज वाहक मुख्य नियंत्रक पेटी जळून खाक झाली.\उच्च वीज दाब वीज वाहिनाचा घरगुती वीज पुरवठ्याशी संबंध नव्हता. तरी स्फोटाची तीव्रता आणि काही तांत्रिक कारणांमुळे हा प्रकार घडला असावा, असा प्राथमिक अंदाज महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. नुकसान झालेल्या घरांचा पंचनामा करण्यासाठी सोमवारी महावितरणचे अधिकारी येणार आहेत, असे स्थानिकांनी सांगितले.