scorecardresearch

Premium

ठाणे : दीड वर्षीय मुलीची जमीनीवर आपटून हत्या;शिळडायघर पोलिसांनी केली वडिलांना अटक

याप्रकरणी शिळडायघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी अलताफ याला अटक केली आहे.

father killed his one and half year old daughter
प्रातिनिधिक छायाचित्र

डायघर भागात अलताफ मोहम्मद समिउल्लाह अन्सारी (२६) याने रागाच्या भरात स्वतःच्या दीड वर्षीय मुलीची जमीनीवर आपटून हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी शिळडायघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी अलताफ याला अटक केली आहे. डायघर येथील अभयनगर परिसरात अलताफ हा त्याची पत्नी आणि दीड वर्षाच्या मुलीसोबत राहत होता.

हेही वाचा >>> ठाण्याच्या बाळकुम परिसरात लिफ्ट कोसळून ६ कामगारांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

two men beaten to death by mob in thane
चोर असल्याच्या संशयावरून जमावाने केलेल्या मारहाणीत दोघांचा मृत्यू, अंबरनाथ शहरातील प्रकार, गुन्हा दाखल
malegaon, stolen bikes seized, seven people detained
मालेगावातून चोरीच्या १३ दुचाकी हस्तगत, सात जण ताब्यात
pune gangsters interrogated at police commissionerate
पोलिसांनी पुण्यातील ‘भाईं’चा नक्षा उतरविला… गज्या मारणे, बाबा बोडके, निलेश घायवळसह ३०० गुंडांची पोलीस आयु्क्तालयात चौकशी
pune gangsters interrogated at police commissionerate
पोलिसांनी पुण्यातील ‘भाईं’चा नक्षा उतरविला…गज्या मारणे, बाबा बोडके, निलेश घायवळसह ३०० गुंडांची पोलीस आयु्क्तालयात चौकशी

अलताफ मजूरीची कामे करतो. त्याला मद्याचे व्यसन असून त्याचे पत्नीसोबत वाद होत होते. अशाचप्रकारे १५ दिवसांपूर्वी अलताफ आणि त्याच्या पत्नीमध्ये वाद झाला होता. या वादातून ८ सप्टेंबरला अलताफ याने मुलीला आणि पत्नीला घराबाहेर काढले. त्यानंतर मुलीला उचलून अंगणातील जमीनीवर आपटले. या घटनेत मुलीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तिला रुग्णालयात नेले असता, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. याप्रकरणी त्याच्या पत्नीने रविवारी दिलेल्या तक्रारीवरून शिळडायघर पोलीस ठाण्यात अलताफविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Father killed his one and half year old daughter by hitting her on ground zws

First published on: 10-09-2023 at 21:09 IST

आजचा ई-पेपर : ठाणे

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×