लोकसत्ता खास प्रतिनिधी

डोंबिवली : कल्याण पूर्वेतील आडीवली ढोकळी गावातील माणगंगा रेसिडेन्सी इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांच्या दोन गटात सोसायटीच्या व्हॉट्सअप ग्रुपवरील एका संदेशावरून जोरदार लिखित स्वरुपात बाचाबाची झाली. त्यानंतर हा विषय चव्हाट्यावर येऊन सोसायटीतील दोन गटात जोरदार राडा होऊन एकमेकांवर विनयभंगांचे गुन्हे मानपाडा पोलीस ठाण्यात दाखल केले आहेत.

मंगळवारी रात्री एक वाजताच्या दरम्यान हा प्रकार घडला. कल्याण पूर्वेत कोहीनूर इडन सोसायटी जवळील आडीवली ढोकळी गावातील माणगंगा रेसिडेन्सी या इमारतीत हा प्रकार घडला आहे. या प्रकरणातील परस्पर विरोधी तक्रारीत ॲड. सुनीता सुनील पासी यांनी सोसायटीतील गोविंद राम, अल्पेश दातखिळे, राज नंदिनी, फुलकुमारी राम, आकाश साळवे, रेणु पाठक यांच्यासह १४ रहिवाशांच्या विरुध्द तक्रार केली आहे. याच सोसायटीतील मंतोरनीदेवी गिरीजाशंकर राम यांनी ॲड. सुनीता पासी, सुनील पासी, मनोज निसार, सोनू रजाक, योगेश बाविस्कर, पूनम बाविस्कर, बिपीन शर्मा, अनुराग तिवारी, आलोक नाईक यांच्या विरुध्द मारहाण, विनयभंगाची तक्रार केली आहे.

आणखी वाचा-उल्हासनगर पालिका अतिरिक्त आयुक्तांवर विनयभंगाचा गुन्हा, जाहिरात घोटाळ्यातील कारवाई रोखण्याचा प्रयत्नाचा अधिकाऱ्याचा आरोप

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलिसांनी सांगितले, सोसायटीतील रहिवासी गोविंद राम याने सोसायटीच्या व्हॉट्सअप ग्रुपवर एका संदेशावरून भांडण सुरू केले. तक्रारदार ॲड. सुनिता पासी यांनी यासंदर्भात राम यांना विचारणा केली. त्याचा राग येऊन राम यांच्यासह इतर आरोपींनी ॲड. पासी यांना शिवागीळ करत त्यांचा विनयभंग केला. तसेच सुनिता यांच्या पतीला मारहाण केली. याच सोसायटीतील मंतोरनदेवी राम यांनी ॲड. सुनिता पासी यांच्यासह इतरांविरुध्द मानपाडा पोलीस ठाण्यात गैरकायद्याची मंडळी जमवून आपणास मारहाण करत आपला विनयभंग केल्याची तक्रार केली आहे. साहाय्यक पोलीस निरीक्षक गोविंद आरळेकर, पोलीस उपनिरीक्षक सचिन सूर्यवंशी याप्रकरणाचा तपास करत आहेत.