ठाणे : ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांची शिवसेनेच्या प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन त्यांच्यावर ही नवीन जबाबदारी सोपविण्यात येत असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंडखोरी केली. त्यावेळी त्यांच्यासोबत अनेक आमदार गेले होते. त्याचबरोबर ठाण्यातून सगळ्यात आधी त्यांना आपला पाठींबा जाहीर करण्यात नरेश म्हस्के यांनी पुढाकार घेतला होता. त्यानंतर ठाणे शिवसेनेतील मंडळींना शिंदे यांच्यासोबत आणण्यात देखील त्यांनी महत्वाची जबाबदारी पार पडली होती. मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर चोहोबाजूंनी टीकेचा वर्षाव होत होता, तेव्हा त्यांचे पुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासोबत ठाण्यातील त्यांच्या निवासस्थानाबाहेर त्यांच्या समर्थनार्थ सभा आयोजित करण्यात आली. तेव्हाही म्हस्के त्यांच्यासोबत होते. यावेळी त्यांनी केलेल्या जोरदार भाषणामुळे उद्धव ठाकरे यांनी त्यांची ठाणे जिल्हाप्रमुख पदासह शिवसेनेतून हकालपट्टी केली होती. मात्र एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री होताच पक्षातील ज्या पदाधिकाऱ्यावर अन्याय झाला, त्यांना न्याय देण्यासाठी पुढाकार घेतला. सगळ्यात आधी त्यांनी नरेश म्हस्के यांची ठाणे जिल्हाप्रमुख पदी पुनर्नियुक्ती केली होती. त्यानंतर राज्यभरात अनेक नियुक्त्या करण्यात आल्या.

हेही वाचा.. सलग दुसऱ्या दिवशीही प्रवाशांकडून घोषणाबाजी ; साधी लोकल बंद करून वातानुकूलित केल्यामुळे संताप

हेही वाचा… Maharashtra News Live : विधिमंडळ कामकाजाला घोषणाबाजीने सुरुवात; राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एकनाथ शिंदे यांच्या गटाचे दीपक केसरकर हे मुख्य प्रवक्ते आहेत. त्यांच्याशिवाय किरण पावसकर, शीतल म्हात्रे यांचीही प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यात आता या पदावर नरेश म्हस्के यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. म्हस्के हे शिवसेनेचा आक्रमक चेहरा म्हणून ठाण्यात ओळखले जातात. त्यांनी महापौरपदाच्या कारकिर्दीत काँग्रेस राष्ट्रवादीने केलेल्या आरोपांना जशास तसे उत्तर दिली होती. त्यामुळे ते प्रवक्तेपदाची भूमिका योग्यप्रकारे पार पडतील असे दावे शिंदे गटाकडून केले जात आहेत.