scorecardresearch

Premium

माजी कुलगुरू प्रधान मारहाण प्रकरण, डोंबिवलीतील विद्यानिकेतन शाळेच्या शिक्षकांकडून काळ्या फिती लावून निषेध

माजी कुलगुरू प्रा. अशोक प्रधान प्रकरणाचा निषेध करण्यासाठी मानपाडा-उंबार्ली येथील विद्यानिकेतन शाळेच्या शिक्षकांनी शनिवारपासून काळ्या फिती लावून निषेध आंदोलन सुरू केले आहे.

Former Vice-Chancellor assault case protest by teachers of Vidyaniketan School in Dombivli
आठवडाभर हे निषेध आंदोलन सुरू राहणार आहे.(फोटो- लोकसत्ता टीम)

लोकसत्ता खास प्रतिनिधी

डोंबिवली – माजी कुलगुरू प्रा. अशोक प्रधान प्रकरणाचा निषेध करण्यासाठी शनिवार पासून येथील उपक्रमशील शाळा म्हणून नावलौकिक असलेल्या मानपाडा-उंबार्ली येथील विद्यानिकेतन शाळेच्या शिक्षकांनी शनिवारपासून काळ्या फिती लावून निषेध आंदोलन सुरू केले आहे. आठवडाभर हे निषेध आंदोलन सुरू राहणार आहे.

education department red and green dots student ID cards criticism maharashtra pune
‘ओळखपत्रावरील ठिपका’ वादात, शिक्षण विभागाच्या परिपत्रकावर टीका
bombay hc quashes fir against college student for rash driving that killed stray dog
वाहनाखाली चिरडून भटक्या श्वानाचा मृत्यू; आरोपी विद्यार्थ्याच्या शैक्षणिक कारकिर्दीवर परिणाम नको, न्यायालयाकडून गुन्हा रद्द
demolition of Babri ftii campus ram mandir pune fir registered marathi news
फिल्म इन्स्टिट्यूटच्या आवारात बाबरी मशीद पाडल्याच्या निषेधार्थ फलक लावणाऱ्यांचा छडा, ‘या’ विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई
The computer server used for the Maratha community survey is down pune news
मराठा समाजाच्या सर्वेक्षणाचा पुण्यात पहिल्याच दिवशी फज्जा

शिक्षणक्षेत्रातील एका प्रतिष्ठित व्यक्तिला एका बडतर्फ शिक्षकाकडून मारहाण होते. हे निंदनीय आहे. अशा प्रवृत्तीना वेळीच कायद्याने रोखले नाहीतर या प्रवृत्तींचे पेव फुटण्याची भीती आहे. एखाद्याने शिक्षकाने एखाद्या विद्यार्थ्याला शिकविताना समज दिली. संबंधित विद्यार्थी परीक्षेत नापास झाला तर त्या शिक्षकाच्या घरी जाऊन समाजकंटक त्या शिक्षकाला किंवा त्याच्या कुटुंबीयांना दगाफटका करू शकतात. त्यामुळे प्रा. प्रधान यांच्या सारखा प्रकार अन्य कोणाबाबतही घडू नये. अशा आरोपी व्यक्तिला कठोर शिक्षा झाली पाहिजे. प्रत्येक शाळेने प्रा. प्रधान यांना पाठिंबा देण्यासाठी अशाप्रकारे काळ्याफिती निषेध व्यक्त केला पाहिजे, असे विद्यानिकेतन शाळेचे संस्थापक अध्यक्ष विवेक पंडित यांनी सांगितले.

आणखी वाचा-ठाणे जिल्ह्यात अवकाळी पाऊस, ग्रामीण भागात गारा

काळ्या फिती लावून का शिकवले जात आहे. याची माहिती विद्यार्थ्यांना शिक्षकांकडून दिली जात आहे. शिक्षणक्षेत्रात मारहाण, हल्ला अशी घुसणारी प्रवृत्ती वेळीच रोखली गेली पाहिजे. या प्रकरणाचा तपास योग्यरितीने होऊन संबंधितांना कठोर शिक्षा झाली पाहिजे. प्रा. प्रधान यांना मारहाण म्हणजे समस्त शिक्षक वर्गाला मिळालेला हा इशारा आहे. प्रत्येक शिक्षण संस्थेने जागृत राहून या घटनेचा निषेध करावा, असे आवाहन पंडित यांनी केले आहे.

आमदारांकडून समर्थन

कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे, कोकण शिक्षक मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी प्रा. प्रधान यांना झालेल्या मारहाणीचा तीव्र शब्दात निषेध करून या प्रकरणाचा सखोल तपास पोलिसांनी करण्याची मागणी केली आहे. तसेच या प्रकरणातील आरोपी शिक्षकाला कठोरात कठोर शिक्षा होईल यादृष्टीने प्रयत्न करण्याचे आवाहन पोलिसांना केले आहे. येत्या विधीमंडळ अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित करण्याची तयारी काही आमदारांनी केली आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Former vice chancellor assault case protest by teachers of vidyaniketan school in dombivli by wearing black ribbons mrj

First published on: 26-11-2023 at 22:03 IST

आजचा ई-पेपर : ठाणे

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×