डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या पूर्व, पश्चिम भागाचे सुशोभिकरण करण्यात येणार आहे. मागील १०० वर्षाच्या काळात डोंबिवलीसाठी योगदान देणाऱ्या ६० व्यक्तिमत्वांचा परिचय रेल्वे स्थानकांच्या दोन्ही बाजुला सुशोभिकरणाच्या माध्यमातून करुन दिला जाणार आहे. या सुशोभिकरण कामाचे भूमिपूजन शुक्रवारी संंध्याकाळी पाच वाजता येथील पश्चिमेतील गुप्ते रस्त्यावरील कार्यक्रमात करण्यात येणार आहे.

राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि भाजपचे डोंबिवलीतील आमदार रवींद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून डोंबिवली पूर्व, पश्चिमेत हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या भूूमिपूजन कार्यक्रमाला खासदार डाॅ.श्रीकांत शिंदे यांनाही आमंत्रित करण्यात आले आहे. डोंबिवली पूर्व, पश्चिम भागात प्रत्येकी ३०-३० अशा पध्दतीने नाट्य, साहित्य, कला, चित्रपट, उद्योग, शिक्षण, क्रीडा क्षेत्रातील गुणवंत व्यक्तिमत्वांची माहिती एकाच ठिकाणी नागरिकांना पाहण्यास मिळणार आहे. रेल्वे स्थानकाच्या दोन्ही बाजुला सहा प्रवेशव्दारे असणार आहेत. या प्रवेशव्दारांंवर साहित्यिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा क्षेत्रातील डोंबिवलीची ओळख प्रतिकांच्या माध्यमातून दिली जाणार आहे. प्रवेशव्दारांच्या मधल्या गाळ्यांमध्ये ६० व्यक्तिमत्वांची प्रतीमेसह माहिती दिली जाणार आहे.

BJP experiment, south Mumbai,
मते वाढविण्याचा भाजपचा प्रयोग
dharmarao baba Atram, Present Evidence, Wadettiwar s Alleged BJP Entry, Press Conference, dharmarao baba Atram Press Conference, vijay Wadettiwar, oppositon leader of maharashtra assembly, congress, ncp, lok sabha 2024, gadchiroli lok sabha seat,
विजय वडेट्टीवार यांच्या भाजप प्रवेशावर धर्मरावबाबा आत्राम उद्या करणार मोठा खुलासा?
curiosity about indians performance in paris olympic
अन्वयार्थ : असले ‘अव्वल स्थान’ काय कामाचे?
raju shetty allegations against dhairyasheel mane over development work
खासदारांचे विकासकामात गौडबंगाल, इतरांची कामे आपल्या नावावर खपवली; राजू शेट्टी यांचा धैर्यशील माने यांच्यावर आरोप

हेही वाचा… VIDEO : ठाण्यात वातावरण तापलं, उद्धव ठाकरेंचे ९० टक्के बॅनर्स फाडले; पोलिसांवर आरोप करत आव्हाड म्हणाले…

डोंबिवली पूर्व भागातील रेल्वे स्थानक परिसराला फेरीवाल्यांचा नेहमीच वेढा पडलेला असतो. स्थानकाच्या पश्चिम दिशेला विष्णूनगर मासळी बाजाराची दुर्गंधी असते. त्यामुळे रेल्वे स्थानक परिसरातून येजा करणे नागरिकांसाठी नेहमीच मोठे दिव्य ठरते. डोंंबिवली शहरात प्रवेश करताना हे नकारात्मक चित्र उभे राहते. नवा पाहूणा अथवा एखादा चाकरमानी शहरात पहिल्यांदा प्रवेश करतो तेव्हा डोंबिवली स्थानकाची ही अवस्था पाहून नाक मुरडतो. हे चित्र बदलावे यासाठी वेगवेगळे प्रयत्न गेल्या काही काळापासून केले जात असून त्याचाच एक भाग म्हणून डोंंबिवली रेल्वे स्थानक सुशोभिकरणाचा निर्णय घेण्यात आला आहे, असे भाजप कार्यालयातून सांगण्यात आले.

हेही वाचा… कल्याण शहर कोंडीच्या विळख्यात, पालिका मुख्यालयाला विक्रेत्यांचा विळखा

खासदारांची उपस्थिती

डोंबिवलीचे भाजप आमदार रविंद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून साकारत असलेल्या या कार्यक्रमास प्रमुख पाहूणे म्हणून खासदार श्रीकांत शिंदे यांना निमंत्रीत करण्यात आले आहे. गेल्या काही महिन्यांपासून चव्हाण आणि शिंदे यांचा सार्वजनिक कार्यक्रमातील वावर वाढला असून या दोन नेत्यांमधील संवाद वाढावा यासाठी प्रयत्नही केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर या कार्यक्रमास स्थानिक खासदार या नात्याने शिंदे यांना खास निमंत्रीत करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात या दोन नेत्यांमधील बदलत्या राजकीय संबंधांची चर्चा रंगली आहे.