नवी मुंबई : वाशी येथे नुकत्याच झालेल्या खाटीक समाजाच्या मेळाव्यात राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी त्यांच्याकडे हरिण आणि बिबट्याची पिल्ले होते. परंतू, वनमंत्री झाल्यानंतर मी त्या प्राण्यांना सोडून दिले, असे वक्तव्य केले. या वक्तव्यानंतर विरोधी पक्ष आणि पर्यावरण कार्यकर्त्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत त्यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे. यानंतर, आता नाईक यांनी वन्यप्राण्यांवर केलेल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले, ‘ माझ्या एका सार्वजनिक कार्यक्रमाच्या संवादातील विधानाचा चुकीचा अर्थ लावला गेला आहे.

माझ्याकडे विचारणा केली असती तर, मी याबद्दल सविस्तर माहिती दिली असती. माझे वक्तव्य हे केवळ वन्य प्राण्यांबद्दल असलेल प्रेम आणि जिव्हाळ्याचे उदाहरण म्हणून होते, असे नाईक यांनी स्पष्ट केले. राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी खाटीक समाजाच्या मेळाव्यात माझ्याकडे हरिण आणि बिबट्याची पिल्ले होते. परंतू, वनमंत्री झाल्यानंतर मी त्या पिल्लांना सोडून दिले. त्यांच्या या वक्तव्यामुळे विरोधी पक्षात तसेच पर्यावरणप्रेमींमधून संताप व्यक्त होत आहे. विरोधी पक्षांकडून यावर टीका केली जात आहे.

शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे बेलापूर विधानसभा क्षेत्राचे जिल्हाप्रमुख किशोर पाटकर यांनी देखील या प्रकरणावर माध्यमांना प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले नाईक यांनी ती पिल्ले सध्या कुठे आहेत सांगावे नाहीतर, वेळ पडल्यास मी न्यायालयात जाऊन जनहित याचिका दाखल करेल असा इशारा नाईक यांना दिला आहे. वारंवार होत असलेल्या टीकेनंतर, नाईक यांनी वन्यजीव प्राणी विषयक केलेल्या विधानाचा चुकीचा अर्थ काढला जात असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. नाईक यात म्हणाले आहेत की, ‘माझ्या एका सार्वजनिक कार्यक्रमातील संवादातील विधानाचा चुकीचा अर्थ लावला गेला आहे.

माझ्याकडे विचारणा केली असती तर, मी याबद्दल सविस्तर माहिती दिली असती. मी स्पष्ट सांगू इच्छितो की, माझे वक्तव्य हे केवळ वन्य प्राण्यांबद्दल असलेले प्रेम आणि जिव्हाळ्याचे उदाहरण म्हणून होते. वन्य प्राण्यांची शिकार कोणीही करू नये, त्यांना पाळू नये, सोडून द्यावे यासाठी मी उदाहरण दिले होते. अनेक वेळा शेतात वन्य प्राणी येतात.

काही जखमी असतात. अशा वेळेस प्राण्यांवर दयाभाव दाखवून त्यांना रेस्क्यू सेंटर मध्ये सोडून द्यावे. प्राण्यांची योग्य जागा नैसर्गिक अधिवास आहे. माझ्याकडे कधीही कोणत्याही प्रकारे वन्य प्राणी बेकायदेशीररीत्या ठेवले नव्हते. वन्य प्राणी जंगलातच सुरक्षित असतात, आणि त्यांचे रक्षण करण्यासाठी शासनाने आखलेल्या सर्व नियमांचं काटेकोर पालन होणे आवश्यक आहे, असे स्पष्टीकरण वनमंत्री गणेश नाईक यांनी दिले आहे.