डोंबिवली – कल्याण, डोंबिवली शहराच्या काही भागांत मंगळवारी सकाळी जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसाने कामावर निघालेल्या नागरिकांची तारांबळ उडवली. बाजारपेठांमध्ये दुकाने लावण्याच्या गडबडीत असलेल्या व्यापाऱ्यांची पळापळ झाली. कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात मोकळ्या जागेत व्यवसाय करणाऱ्या फुल, फळे व्यापाऱ्यांची सामान झाकण्यासाठी पळापळ सुरू होती.

हेही वाचा – भिवंडीतील इमारत दुर्घटनेतील मृतांची संख्या आठ ; शोधकार्य थांबविले

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बुधवारी सकाळी आठ वाजल्यापासून आकाश काळ्या ढगांनी भरत चालले होते. पावसाची लक्षणे दिसत असतानाच, सकाळी दहा वाजता मुसळधार पावसाच्या सरी सुरू झाल्या. कामावर निघालेल्या चाकरमान्यांना इमारत, निवाऱ्याचा आडोसा घेऊन उभे रहावे लागले. पाऊस सुरू झाल्याने आणि तो थांबत नसल्याने अनेक नागरिकांनी छत्री घेऊन घरातून बाहेर पडणे पसंत केले. पाऊस सुरू होताच सुट्टीचा आनंद घेत असलेली शाळकरी मुले रस्त्यांवर पावसात भिजत होती. मुसळधार पावसाचा जोर कमी होऊन नंतर पावसाची रिमझिम सुरू झाली होती.