ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय शरद पवार यांनी जाहीर केला आहे. त्यांनी घेतलेला हा निर्णय मागे घ्यावा असा आग्रह कार्यकर्त्यांनी धरला आहे. याच मागणीसाठी ठाण्यात राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते कार्यालय परिसरात उपोषणाला बसले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी मुंबईतील एका कार्यक्रमात बोलताना स्वत:च्या राजकीय जीवनाबाबत मोठी घोषणा केली. प्रदीर्घ कालावधीनंतर आता कुठेतरी थांबण्याचा विचार करणे आवश्यक आहे. त्यामुळे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे, असे त्यांनी जाहीर केले. त्यांनी घेतलेल्या या निर्णयानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांना धक्का बसला आहे.

हेही वाचा – कल्याण : सफाई कामगारांनी प्रभाग स्तरावर बदली आदेश बदलल्यास कठोर कारवाई, घनकचरा उपायुक्त अतुल पाटील यांचा इशारा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शरद पवार यांनी घेतलेला निर्णय मागे घ्यावा, असा आग्रह राष्ट्रवादीच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांनी धरला आहे. याच मागणीसाठी ठाण्यातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते कार्यालयाच्या परिसरात उपोषणाला बसले आहेत. या उपोषणात महिलाध्यक्ष सुजाताताई घाग, शहर सरचिटणीस रवींद्र पालव यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.