ठाणे – हवामान विभागातर्फे पुढील दोन दिवस ठाणे जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा ( रेड अलर्ट ) देण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून ठाणे जिल्हा प्रशासनातर्फे जिल्ह्यातील बारावी पर्यंतच्या सर्व शाळा आणि महाविद्यालयांना उद्या शुक्रवार, २१ जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी याबाबत माहिती दिली आहे.

ठाणे जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये बुधवारी धरणात पाणीदेखील साचले होते. जिल्ह्यातून जाणाऱ्या उल्हास नदीची पाणी पातळी वाढल्याने परिस्थितीचा धोकाही उद्भवला होता. मात्र गुरुवारी पावसाचा जोर काहीसा ओसरल्याने नद्यांच्या पाणी पातळीत घट झाली आहे. असे असले तरीही हवामान विभागातर्फे पुढील ४८ तास हे ठाणे जिल्ह्यासाठी अतिवृष्टीचे असल्याचे सांगण्यात आले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याच पार्श्वभूमीवर पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी बैठक घेत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागासह सर्व यंत्रणांना उद्भवल्यास तातडीने उपाय योजना राबविण्यासाठी सज्ज राहण्याचे आदेशही दिले आहेत. याबरोबरच खबरदारीचा उपाय म्हणून ठाणे जिल्ह्यात उद्या, शुक्रवार २१ जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व इयत्ता बारावी पर्यंतच्या महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद व खासगी शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केल्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी सांगितले आहे. तर अशा परिस्थितीतही शाळा भरविल्यास काही घटना घडल्यास त्यास ते शाळा आणि महाविद्यालय व्यवस्थापन जबाबदार असतील असेही जिल्हाधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.