गणपती बाप्पा मोरया-पुढच्या वर्षी लवकर याचा जयघोष करत गणेश भक्तांनी सोमवारी कल्याण डोंबिवलीत आठ हजार ८० खासगी, तीन हजार ४६७ गौरींना निरोप दिला. २७ गाव भागातील १५ सार्वजनिक गणपतींचे विसर्जन करण्यात आले. गणपती विसर्जनासाठी खाडी, नदी किनारी गणेश भक्तांनी बाप्पाला निरोप देण्यासाठी गर्दी केली होती.

हेही वाचा >>> उल्हासनगरः विजेच्या धक्क्याने तरूणाचा मृत्यू ; रोहित्राशी छेडछाड करणे जीवावर बेतले

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दुपारी चार वाजल्या पासून खासगी गणपती, गौरींच्या मिरवणुका शहराच्या विविध भागातून विसर्जन स्थळी निघाल्या. ढोल ताशे, बॅन्ड पथकांच्या गजरात नाचत गणेश भक्त मिरवणुकांमध्ये सहभागी झाले होते. कल्याण मध्ये वालधुनी, गणेश घाट दुर्गाडी, आधारवाडी तलाव, गौरीपाडा तलाव, काळा तलाव, डोंबिवलीत रेतीबंदर खाडी, ठाकुर्ली विहिर अशा ६८ ठिकाणी आणि पालिकेचे कृत्रिम ३८ तलावांच्या ठिकाणी गणेश भक्तांनी गणपतीचे विसर्जन केले. खाडी किनारी पालिकेने तराफे तयार करुन गणपती विसर्जनाची तयारी केली होती. शिस्तबध्द नियोजन करुन बाप्पांचे विसर्जन केले जात होते.
ठाकुर्ली, खंबाळपाडा, ९० फुटी रस्ता येथे गणेश भक्त रेल्वे मार्ग ओलांडून खाडी किनारी गणपती विसर्जनासाठी जात होते. येणाऱ्या जाणाऱ्या लोकल पाहून जीव धोक्यात घालून गणेश भक्त रेल्वे मार्गातून येजा करत होते. विसर्जन ठिकाणी गर्दी होऊ नये म्हणून पोलीस, अग्निशमन जवान, गृहरक्षक दलाचे जवान, ईगल ब्रिगेडचे कार्यकर्ते तैनात होते.